Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
जनजागृती आणि प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे मुंबईमध्ये एचआयव्ही रुग्णसंख्या गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत घटली आहे. सन२०१९-२० मध्ये ४, ६१७ एचआयव्ही रुग्णांची नोंद झाली होती.
एचआयव्हीचे निदान झालेल्या रुग्णांमध्ये १५ ते ४९ वयोगटातील ७५ टक्के रुग्णसंख्या आहे. त्यात महिला रुग्णांचे प्रमाण ३१ टक्के इतके असल्याचे उपलब्ध माहितीमधून दिसून येते. ज्या नव्या रुग्णसंख्येमध्ये एचआयव्हीचे निदान झाले आहे त्यापैकी ९५ टक्के व्यक्तींना असुरक्षित लैंगिक संबधामुळे एचआयव्हीचा संसर्ग झाला, तर चौदा वर्षांखालील तीन टक्के मुलांमध्ये एचआयव्हीचा संसर्ग झाल्याचे दिसते.
या संसर्गित रुग्णांसाठी वैद्यकीय उपचारांची उपलब्धताही तातडीने करण्यात आली आहे. सध्या ४० हजार ६५८ व्यक्ती या एआरटी लाईनवर आहेत. फर्स्ट एआरटी लाइन उपचारपद्धती घेत असलेल्या रुग्णांची संख्या ३३२४७ इतकी तर सेकंड एआरटी लाइन उपचारपद्धतीवर असलेल्या रुग्णांची संख्या ३६१८ इतकी आहे. एक टक्का रुग्ण हे तिसरी एआरटी लाइन औषधोपचारपद्धती घेत आहेत.
चीनमध्ये सापडला सोन्याचा प्रचंड साठा; किंमत ऐकून शॉक व्हाल, आफ्रिकेलाही टाकले मागे
एचआयव्ही रुग्णसंख्या कमी करून ती संपुष्टात आणण्यासाठी २०३०चे उदिष्ट्य ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ९५-९५-९५ उपचारपद्धती वापरण्यात येणार आहे. या उद्दिष्ट्यातंर्गत ९५ टक्के एचआयव्हीसह जगणाऱ्या व्यक्तींना त्यांचे एचआयव्हीची स्थिती कळेल, कोणते उपचार घ्यायचे याची माहिती होईल तसेच उपचार घेत असलेल्या ९५ टक्के व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती सक्षम राहण्यास मदत होईल.
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांचा होणार खोळंबा; रेल्वेकडून मध्य-हार्बरवर उद्या ब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द
‘भेदभाव नको’
एचआयव्हीबाधित रुग्णांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव करू नये हे यावर्षी जागतिक एड्स दिनाचे सूत्र आहे. वैद्यकीय उपचारांमध्ये रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचारासह समानतेची वागणूकही मिळायला हवी असे ‘मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थे’चे अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. विजय करंजकर यांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीसांना कुबड्यांची गरज नाही; कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा कौतुकाचा वर्षाव, म्हणाले…
वर्ष एचआयव्हीसाठी तपासणी केलेली लोकसंख्या निदान (टक्केवारी) एआरटी उपचारावर असणारे रुग्ण
२०१९-२० ६४९८२४ ४६१७ (०.७ टक्के) ४२१७ (९१.३ टक्के)
२०२०-२१ ३५०७०५ २१५३ (०.६टक्के) २०१७ (९३.७ टक्के)
२०२१-२२ ५३७३६६ ३१७९ (०.६टक्के) ३०३० (९५.३ टक्के)
२०२२-२३ ६४८८७० ३४६२ (०.५ टक्के) ३२०७ (९२.६ टक्के)
२०२३-२४ ७२९३०९ ३३८३ (०.५टक्के) ३२२९ (९५.४ टक्के)