Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
साप्ताहिक अंकशास्त्र, 2 डिसेंबर To 8 डिसेंबर 2024 : मूलांक 1 कामात प्रगती, प्रोजेक्ट यशस्वी ! मूलांक 4 सुख- समृद्धीचे शुभयोग ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Weekly Numerology Prediction 2 December To 8 December 2024 : डिसेंबर महिन्याचा हा पहिला आठवडा आहे. या आठवड्यात शुक्राचे मकर राशीच संक्रमण होणार असून शुभ संयोग सगळ्या मूलांकावर पहायला मिळेल. मूलांक 1 सह या मूलांकासाठी कामे मार्गी लागतील तसेच धनलाभाचा योग आहे. मूलांक 3 सह या मुलांकांनी आळस सोडावा म्हणजे कामे मार्गी लागतील. तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.
मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): कामात प्रगती, मान-सन्मानात वाढ
या आठवड्यात ऑफिसच्या कामात प्रगती आणि मान-सन्मानात वाढ आहे. प्रोजेक्टमध्ये अपेक्षेनुसार बदल होतील. आर्थिक परिस्थिती थोडी ठळमळीत असेल कारण खर्च जास्त होणार आहेत. लवलाइफमध्ये अहंकार आडवा येईल, त्यामुळे ताणतणाव वाढण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी काही गोष्टींमुळे तुम्ही उदास होऊ शकता. जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळत नाही असे वाटेल.
मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): कामात इतरांचा हस्तक्षेप वाढेल
हा आठवडा तुमच्यासाठी ठिक आहे. तुमच्या लवलाइफमध्ये सुधारणा होणार आहे. ऑफिसच्या कामात किंवा व्यवसायात बाहेरील काही लोकांचा हस्तक्षेप होईल, त्यामुळे तुमचा त्रास वाढेल. आर्थिक बाबतीत गुंतवणूक वाढेल. व्यवसायात कठोर मेहनत करावी लागेल. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रवास टाळा, ते उत्तम असेल. या आठवड्यात काम करताना सतर्क राहा.
मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): आळस सोडा, कामाला लागा
या आठवड्यात आर्थिक स्थिती उत्तम असून धनलाभाचे प्रबळ योग आहेत. व्यवसायात नवीन प्रोजेक्ट येतील त्यावर लक्ष द्या आणि कामाचे योग्य नियोजन करा. गुंतवणुकीमुळे फायदा होईल. कार्यक्षेत्रात आळशीपणा किंवा कामात चालढकल करणे तुम्हाला महागात पडू शकते. तुमची मते खुलेपणाने मांडा, घाबरू नका. तुमचा स्वभाव त्वरित निर्णय घेणे आणि कामे पटपट करणे असा आहे, याचा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला लाभ होईल.
मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): सुख- समृद्धीचे शुभयोग
हा आठवडा तुमच्यासाठी सुख आणि समृद्धीचे शुभ योग असूव लवलाइफ उत्तम असेल. ऑफिसमधील प्रोजेक्ट यशाच्या मार्गावर पुढे जात आहेत पण त्यावर अधिक मेहनत करावी लागले. तब्येतीची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत धनलाभ असून आठवड्याच्या शेवटी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना उत्तम यश मिळेल.
मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): निर्णय यशस्वी होईल
हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असून विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फलदायी ठरतील. ऑफिसच्या कामात काही अडचणी होतील पण तुम्ही मेहनतीने त्यावर मात कराल. आर्थिक बाबतीत खर्च जास्त आहे, तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करा. लवलाइफ ठिक आहे. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळेल.
मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): नवीन प्रोजेक्ट पूर्ण होणार
हा आठवडा लवलाइफसाठी चांगला आहे. तसेच तुम्ही जे काम करता तिथे तुम्हाला यश मिळेल. तुम्ही जे काही नवीन प्रोजेक्ट हातात घ्याल त्यात शुभलाभाचे योग आहेत. करिअरमध्ये सुधारणा आहे. संवाद महत्त्वाचा आहे त्यामुळे अनेक प्रश्न सोडविले जातील. आठवड्याच्या शेवटी भावनिक दृष्ट्या थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे.
मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): ऑफिस किंवा व्यवसायात अचानक अडचणी
हा आठवडा तुमच्यासाठी ठिक असून लवलाइफ चांगले आहे. कोणतेही काम करताना संयम महत्त्वाचा आहे हे या आठवड्यात कटाक्षाने लक्षात ठेवा. आर्थिक बाबतीत हळूहळू सुधारणा असून धनलाभाचे योग आहेत. ऑफिस किंवा व्यवसायात अचानक अडचणी येऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी नकारात्मक बातमी येण्याची शक्यता आहे.
मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): प्रोजेक्टमध्ये अडचणींची शक्यता
हा आठवडा तुमच्यासाठी ठिक असून लवलाइफमध्ये संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाबतीत थोडा तणाव येऊ शकतो तसेच खर्च जास्त होणार आहे. व्यवसायासाठी कालावधी चांगला आहे. ऑफिसच्या कामात एकटेपणाची अनुभूती होईल. प्रोजेक्टमध्ये काही अडचणी येऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी जीवनात हळूहळू सुधारणा होईल.
मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): धनलाभाचे योग, कामे मार्गी लागणार
हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत धनवृद्धीचे शुभ संयोग घेवून येणार आहे. धनलाभाचे योग असून कामे मार्गी लागतील. ऑफिसच्या कामात जोखमीचे निर्णय घेतल्यास तुम्हाला उत्तम लाभ होईल. लव्हलाइफ चांगली आहे. घरात वातावरण आनंदी असेल तसेच आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जीवनात सुख-शांती समाधान अनुभवाल.