Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, १८ डिसेंबर २०२४ : संकष्ट चतुर्थी! सिंहसह २ राशींनी बोलण्यात गोडवा ठेवा! कामाचा बोझा वाढणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

5

Today Horoscope 18 december in Marathi, आजचे राशीभविष्य:  
आज १८ डिसेंबर बुधवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी संपून चतुर्थी तिथी सुरु होत आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच पुष्य नक्षत्र, ऐंद्र योग आणि बव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसांचे महत्त्व अधिक वाढले आहे. ऑफिसमध्ये नोकरदार लोकांना नवीन अधिकार मिळतील. कामाचा ताण वाढेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी बुधवारचा दिवस कसा आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे राशिभविष्य, १८ डिसेंबर २०२४ : संकष्ट चतुर्थी! सिंहसह २ राशींनी बोलण्यात गोडवा ठेवा! कामाचा बोझा वाढणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Aaj che Rashi Bhavishya 18 december 2024 :
आज १८ डिसेंबर बुधवार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी आहे. तृतीया तिथी संपून चतुर्थी तिथी सुरु होत आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचा शुभ संयोग जुळून आला आहे. तसेच पुष्य नक्षत्र, ऐंद्र योग आणि बव करणाचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसांचे महत्त्व अधिक वाढले आहे. ऑफिसमध्ये नोकरदार लोकांना नवीन अधिकार मिळतील. कामाचा ताण वाढेल. वैवाहिक जीवनातील कोणताही अडथळा त्रास देत असेल तर संपेल. उधार दिलेले पैसे मिळेतील. तुमचे उत्पन्न लक्षात घेऊन पैसे खर्च करा. शारीरिकदृष्ट्या थकवा जाणवेल. मित्रासोबक फिरण्याचा प्लान कराल. वाहन जपून वापरा. कोणाकडून कर्ज घेतले असेल तर परतफेड करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष – कामाचा ताण वाढेल

आज तुम्हाला व्यवसायात कठोर परिश्रम केल्यानंतरही कमी नफा मिळेल. तुमच्या गरजा पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. ऑफिसमध्ये नोकरदार लोकांना नवीन अधिकार मिळतील. कामाचा ताण वाढेल. वैवाहिक जीवनातील कोणताही अडथळा त्रास देत असेल तर संपेल. उधार दिलेले पैसे मिळेतील.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा

वृषभ – वाहन जपून चालवा

आज तुम्ही कुटुंबाच्या समस्या दूर करण्यात यशस्वी व्हाल. पालकांची मदत घ्याल. कुटुंबासाठी आवश्यक वस्तूंच्या खरेदीवर काही पैसे खर्च कराल. तुमचे उत्पन्न लक्षात घेऊन पैसे खर्च करा. शारीरिकदृष्ट्या थकवा जाणवेल. मित्रासोबक फिरण्याचा प्लान कराल. वाहन जपून वापरा
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा.

मिथुन – नोकरीच्या संधी

आज पार्टनरशीपमध्ये केलेल्या व्यवसायात नफा मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. कोणाकडून कर्ज घेतले असेल तर परतफेड करण्यात यशस्वी व्हाल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीला खीर अर्पण करा

कर्क – पैसे खर्च करणे टाळा

आज राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल. शुभ समारंभात सहभागी व्हाल. प्रभावशाली लोकांना भेटाल. दिखाऊपणावर पैसे खर्च करणे टाळा. जुन्या मित्राला भेटाल.
आज भाग्य ८६ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या

सिंह – बोलण्यात गोडवा ठेवा

आज भावंडांसोबत सुरु असलेला वाद संपेल. नात्यात प्रेम वाढेल. दुसऱ्याचे ऐकल्याने नुकसान होईल. टीमवर्कने काम करण्याची संधी मिळेल. टीमच्या मदतीने कामे पूर्ण कराल. बोलण्यात गोडवा ठेवा.
आज भाग्य ६६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा

कन्या – व्यवसायात बदल

आज कलात्मक काम करण्याची रुची वाढेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार कराल. आईबद्दल प्रेम आणि आपुलकी वाढेल. सभोवतालचे वातावरण प्रसन्न होईल. व्यवसायात नवीन बदल करण्याचा विचार करत असाल तर यशस्वी व्हाल.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना जेवू घाला.

तुळ – व्यवसायातून लाभ

आज व्यवसायात एखादी डील फायनल होईल. अचानक व्यवसायातून लाभ होईल. ज्यामुळे मन प्रसन्न होईल. सहकाऱ्यांसाठी पार्टी आयोजित कराल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदाराला भेटवस्तू द्याल. विद्यार्थ्यांना शिक्षणात लक्ष द्यावे लागेल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. संकटनाशक गणेश स्तोत्राचे पठण करा

वृश्चिक – कामातून फायदा

आज जे काम कराल त्यातून फायदा होईल. तुमचा आदर वाढेल. व्यवसायात अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. घर आणि कामाच्या ठिकाणी तुमच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल. आजचा दिवस आनंदी असाल.
आज भाग्य ७३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला दूर्वा अर्पण करा

धनु – कर्जातून मुक्त व्हाल

आज जुन्या कर्जातून मुक्त व्हाल. तुम्हाला कामात मेहनत करावी लागेल. जोडीदारासोबत शॉपिंगला जाल. तुमचे काही पैसे खर्च होतील. घरी पाहुणे येतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवाल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
आज भाग्य ६९ टक्के तुमच्या बाजूने असेल. भगवान विष्णूची पूजा करा

मकर – पैसे उधार देऊ नका

आज पैसे उधार देण्याचा विचार करत असाल तर काळजीपूर्वक विचार करा. पैसे परत मिळण्याची फार कमी शक्यता आहे. जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल. मुलांच्या चांगल्या भविष्यासाठी पैसे गुंतवाल. तुम्हाला भविष्यात फायदा होईल. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या.
आज भाग्य ६४ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवचालीसाचे पठण करा

कुंभ – बोलण्यात गोडवा ठेवा

आज राजकीय दृष्टिकोनातून दिवस चांगला असेल. विरोधत राजकारणात उतरण्याचा प्रयत्न करतील. बोलण्यात गोडवा ठेवा. लोकांची मने जिंकण्यात यशस्वी व्हाल. काही शुभ कामांवर पैसे खर्च कराल. तुमची कीर्ती वाढेल.
आज भाग्य ७४ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरीबांना अन्न-वस्त्र दान करा

मीन – आर्थिक लाभ होतील

आज गुंतवणुकीतून लाभ होईल. नोकरदार लोक काही काम करण्याचा विचार करत असतील तर यशस्वी होतील. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाईल. मुलांच्या शिक्षणातील समस्या दूर होतील. मातृपक्षाकडून आज आर्थिक लाभ होतील.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना तांदूळ दान करा

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.