Warning: array_key_exists() expects parameter 2 to be array, bool given in /home4/darshvyd/tejpolicetimes.com/wp-content/plugins/onesignal-free-web-push-notifications/v3/onesignal-init.php on line 11
Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 26 डिसेंबर 2024: वाढत्या कामामुळे ताणतणावात वाढ ! कुटुंबात नाराजीचा सुर ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

6

Numerology Prediction, 26 December 2024 : 26 डिसेंबर, मूलांक 1 साठी वादविवादामुळे मानसिक ताण वाढेल. मूलांक 2 असणाऱ्यांसाठी मेहनत जास्त आहे. मूलांक 4 च्या जातकांना मदत घ्यावी लागेल. मूलांक 6 असणाऱ्यांना कामातून लाभ होईल. मूलांक 7 च्या कुटुंबात नाराजीचा सुर असेल, मूलांक 9 साठी दिवस उत्तम असून सगळ्यांवर तुमचा प्रभाव पडेल. आज मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Aajche Ank bhavishya, 26 December 2024: 26 डिसेंबर, मूलांक 1 सह या मूलांकांना ताणतणावाचा सामना करावा लागेल. मूलांक 4 सह या जातकांना मदत घ्यावी लागणार आहे. या मूलांकांच्या घरात नाराजीचा सुर असेल. चला तर माहिती घेऊया मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत.

मूलांक 1 – वादविवादामुळे मानसिक ताण

मूलांक 1 साठी आजचा दिवस ठिक आहे पण ऑफिसमधील बदलांमुळे तुम्ही इतर गोष्टींवर जास्त लक्ष देऊ शकणार नाही. तुमचे सहकारी मदत करतील. काही वादविवादामुळे मानसिक ताण होऊ शकतो. तब्येतीची काळजी घ्या.

मूलांक 2 – सहकाऱ्यांमध्ये अचानक बदल

मूलांक 2 साठी आजचा दिवस ओके असेल पण तुमच्या सहकाऱ्यांमध्ये अचानक काही बदल पहायला मिळतील. ज्या जातकांचा संबंध क्रीडा क्षेत्राशी आहे त्यांना खूप मेहनत करावी लागेल. कामाचे नियोजन योग्य प्रकारे करा तुम्हाला लाभ होईल.

मूलांक 3 – संवाद साधताना अडचण

मूलांक 3 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही, लोकांसोबत संवाद साधताना अडचणी येणार आहेत. तुमची कामे अडथळ्यामुळे पूर्ण होऊ शकणार नाही. तुम्हाला मदत घ्यावी लागेल. कुटुंबातील वातावरण ठिक असेल.

मूलांक 4 – मदत घ्यावी लागणार

मूलांक 4 साठी दिवस ठिक असून पैशांच्या बाबतीत मात्र आज तुम्ही कमी भाग्यशाली असणार आहात. तुम्हाला मदतीची गरज लागेल. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे तुम्हाला जास्त काम करावे लागणार आहे.

मूलांक 5 – वाढत्या कामामुळे ताणतणावात वाढ

मूलांक 5 साठी आजचा दिवस ठिक आहे. नातेसंबंधात तुम्ही अधिक गुरफटून जाणार आहात, त्यामुळे तुम्हाला थोडा तणाव जाणवेल. एकटं रहावं असे वाटेल पण तुमची वाढती कामे आणि जबाबदाऱ्यांमुळे तुम्ही ते करू शकणार नाही.

मूलांक 6 – कामातून लाभ होणार

मूलांक 6 असलेल्यांसाठी दिवस ठिक असून कामातून लाभ होणार आहे. पैशांची गरज भासणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी कर्ज घ्यावे लागेल आणि त्यासाठी अर्ज करायचा असेल तर आजचा दिवस चांगला आहे.

मूलांक 7 – कुटुंबात नाराजीचा सुर

मूलांक 7 असणाऱ्यांसाठी दिवस फारसा ठिक नाही. कुटुंबात वातावरण नाराजीचे असेल. एखाद्या सदस्याचे वागणे तुम्हाला खटकेल, निरर्थक मुद्द्यांवरून होणारा वाद टाळावा. तुम्हाला ताणतणाव अधिक होण्याची शक्यता आहे.

मूलांक 8 – उधारीने पैसे घेणार

मूलांक 8 असणाऱ्यांसाठी दिवस ठिक असून मित्रांसोबत काही नवीन योजना बनविणार आहात. पैशांची चणचण भासणार आहे. त्यामुळे तुम्ही उधारीने पैसे घेणार आहात. कामे वाढत आहेत तेव्हा नियोजन नीट करा.

मूलांक 9 – लोकांवर प्रभाव पडणार

मूलांक 9 साठी आजचा दिवस उत्तम असून आसपासच्या लोकांवर तुमचा प्रभाव वाढणार आहे. प्रवासाचे योग आहेत, तसेच घरात एखादे धार्मिक कार्य होईल. खर्चाबद्दल सतर्क राहा अन्यथा तुम्हाला अडचणीचा सामना करावा लागेल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.