Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आर्थिक राशिभविष्य 10 जानेवारी 2025 : मेष राशीने गोड बोलून काम पूर्ण करा ! तुळ राशीचा बँक बँलन्स वाढणार ! पाहा, तुमचे राशिभविष्य

7

Finance Horoscope Today 10 January 2025 In Marathi : आज मेष राशीच्या लोकांनी गोड बोलून काम पूर्ण करावे, वृषभसाठी पद, प्रतिष्ठेत वाढ आहे. मिथुनसह मीन राशीच्या लोकांनी सतर्क रहावे मौल्यवान वस्तू हरविण्याची शक्यता आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनी तब्येतीची काळजी घ्यावी. मकर राशीच्या लोकांनी नवीन संधीचा लाभ घ्यावा. कुंभ राशीच्या लोकांनी वादविवादापासून दूर राहावे. चला तर करिअर आणि आर्थिक बाबतीत आजचा दिवस कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Aaj che Aarthik Rashi Bhavishya 10 January 2025 : 10 जानेवारी, मेषसह या राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून कामे मार्गी लागतील. तुळ सह या राशीच्या लोकांचा बँक बॅलन्स वाढणार आहे. या राशीच्या लोकांनी तब्येतीची काळजी घ्या तसेच खर्च वाढणार आहे. करिअर आणि आर्थिक बाबतीत मेष ते मीन राशीपर्यंतच्या सर्व राशींसाठी दिवस कसा असेल तसेच त्यांची आर्थिक कुंडली काय म्हणते आहे, जाणून घेऊया.

मेष आर्थिक राशिभविष्य : गोड बोलून काम पूर्ण करा

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे फक्त तुम्ही रागावर आणि वाणीवर कंट्रोल ठेवा. कोणासोबत कडवट बोलू नका, गोड बोलल्यामुळे कामे साध्य होतील. प्रत्येक कामात जोडीदाराचे सहकार्य मिळेल. संध्याकाळी थांबलेले काही काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रात्री प्रियजनांशी भेटी होतील त्यामुळे मन प्रसन्न राहील.

वृषभ आर्थिक राशिभविष्य : पद, प्रतिष्ठेत वाढ

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मानसिक समाधान देणार आहे. राजकीय क्षेत्रात असणाऱ्यांना यश मिळेल. सरकारी कामे मार्गी लागतील. नवीन करारांमुळे पद आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. तुम्हाला न आवडणाऱ्या लोकांची भेट झाल्यामुळे थोडा मूड ऑफ होईल. अनावश्यक कष्टांचा सामना करावा लागेल. मुलांकडून चांगले काम होणार आहे.

मिथुन आर्थिक राशिभविष्य : मौल्यवान वस्तू हरविण्याची शक्यता, सावध राहा

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तुम्हाल सतर्क रहावे लागेल कारण मौल्यवान वस्तू चोरी होण्याची किंवा हरविण्याची शक्यता आहे. मुलांच्या शिक्षणासंदर्भात फार चांगली बातमी मिळणार नाही त्यामुळे मन दुःखी होईल. संध्याकाळी काही थांबलेले कार्य पूर्ण होईल. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होणार आहात.

कर्क आर्थिक राशिभविष्य : कामात प्रगती होणार

कर्क राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून तुमच्या कामात प्रगती दिसेल. धनलाभासह मान, प्रतिष्ठा वाढणार आहे. मुलांच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीन पूर्ण करणार आहात. प्रवास लाभदायक असेल. संध्याकाळी चांगली बातमी मिळेल त्यामुळे मन प्रसन्न होईल. व्यवसायात फोकस ठेवा, नफा अधिक होईल.

सिंह आर्थिक राशिभविष्य : प्रगतीच्या संधी येतील, लाभ घ्या

सिंह राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून पैसे मिळविण्याचे अनेक मार्ग खुले होतील. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात तिथे तुम्हाला अनेक संधी मिळतील. वाणीवर नियंत्रण राहू दे कारण आदरपूर्वक वागणे तुमचा मान सन्मान वाढवेल. शिक्षण, स्पर्धा परिक्षेत यश मिळेल. दिवसभर धावपळ असून डोळ्यांचे आजार डोके वर काढतील. तब्येतीची काळजी घ्या.

कन्या आर्थिक राशिभविष्य : नोकीर – व्यवसायात उत्तम यश

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक असून तुमच्या पराक्रमात वाढ होईल. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला यश मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल त्यामुळे मन प्रसन्न राहील. कायदेशीर वादावर तोडगा सापडेल. तुम्ही चांगल्या कामासाठी खर्च करणार आहात.

तुळ आर्थिक राशिभविष्य : बँक बॅलन्स वाढणार

तुळ राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला असून आजूबाजूचे वातावरण सुखद असेल. अनेक दिवसांपासून सुरु असणारी आर्थिक समस्या सुटेल. बँक बॅलन्स वाढल्यामुळे तुम्ही गुंतवणुकिचा विचार करु शकता. जवळचा किंवा दूरचा प्रवास आहे पण तो पुढे ढकलला जाईल. व्यवसायात लाभ आहे.

वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : तब्येतीची काळजी घ्या

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस फारसा ठिक नाही. काही आजाक अचानक डोके वर काढतील. तुम्ही वेळेत तपासणी करून घ्या. चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज जास्त खर्च होणार आहे. कार्यक्षेत्रात वातावरण ठिक असेल. कामे वाढत आहे त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे.

धनू आर्थिक राशिभविष्य : सरकारी कामे मार्गी लागणार

धनु राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक आहे. आज विरोधक काहीच करु शकणार नाही. सरकारी कचेरीत तुमची कामे पटापट मार्गी लागतील. सासरकडून धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. घरात वातावरण समाधानी असेल.

मकर आर्थिक राशिभविष्य : नवीन संधीचा लाभ घ्या

मकर राशीच्या लोकांसाठी दिवस ठिक असून आर्थिक बाबीत यश आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात कार्य करत आहात, तिथे नवीन संधी येतील त्याचा लाभ घ्या. तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील. संध्याकाळी कोणत्याही वाद-विवादात पडू नका. रात्री प्रियजन किंवा पाहुणे येणार आहेत. खर्च वाढणार आहे त्यामुळे बजेटवर परिणाम होईल. व्यवसायात लाभ आहे.

कुंभ आर्थिक राशिभविष्य : वादविवादापासून दूर राहा

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण तब्येतीची काळजी घ्या. निरर्थक वादापासून दूर राहा. विरोधक त्रास देतील पण बुद्धी चातुर्याने त्यावर मात करा. काही वाईट बातमी ऐकून तुम्हाला प्रवास करावा लागेल, सावध राहा. वादविवाद टाळा आणि अपशब्द बोलू नका.

मीन आर्थिक राशिभविष्य : मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ठिक आहे पण काही कारणामुळे मुलांचे टेन्शन येणार आहे. कुटुंबात येणाऱ्या अडचणी संपुष्टात येती. सासरच्या व्यक्तींसोबत आज आर्थिक व्यवहार करु नये, अन्यथा संबंध खराब होण्याची शक्यता आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्याचा प्लॅन करणार आहात. दानधर्म केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. मौल्यवान वस्तू चोरी होण्याची शक्यता आहे.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते.आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.