Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आजचे अंकभविष्य, 17 फेब्रुवारी 2025 : मूलांक 3 कौटुंबिक जीवनात समाधान !मूलांक 9 कार्यक्षेत्रात नवे मार्ग खुले होणार ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Numerology Prediction, 17 February 2025 : चित्रा नक्षत्र, सोमवार तसेच धन योग आणि मालव्य योग असल्यामुळे सगळ्या जातकांवर शंभो महादेवाची कृपा राहील. मूलांक 1 सह या मूलांकांसाठी दिवस उत्तम असून ऑफिसमध्ये वातावरण चांगले असेल. तुमची कामे पटापट मार्गी लागतील. मूलांक 4 सह या जातकांवर संकट येतील पण त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही सक्षम आहात. चला तर पाहूया अंकभविष्य, मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?
मूलांक 1 – आत्मविश्वास वाढेल, कामे मार्गी लागतील

मूलांक 1 असलेल्यांना आजचा दिवस फार चांगला जाईल. आज तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल असे काम तुम्ही करून दाखवाल. आज आत्मविश्वास द्विगुणीत होवून तुमची कामे पटापट मार्गी लागतील. आज कुटुंबीयांसोबत एखाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे नियोजन कराल. जोडीदासोबत संबंध मधुर राहतील. एकूण आजचा दिवस सुखद राहील.
मूलांक 2 – व्यापार विस्ताराचे नवे मार्ग खुले

मूलांक 2 असलेल्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. आज तुमच्यासाठी धनलाभाचे योग आहेत. थकलेले पैसे आज हाती येतील. आजचा दिवस व्यापारात भार चांगला आहे. व्यापार विस्तारासाठी नवे मार्ग खुले होतील. कौटुंबिक बाबतीत विचार करता तुम्ही कुटुंबात एकाद्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन कराल, त्यामुळे घरी उत्सवी वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित होईल.
मूलांक 3 – कौटुंबिक जीवनात भरभरून सुख

मूलांक 3 असलेल्या जातकांना आजचा दिवस फार चांगला जाईल. व्यापार विस्ताराच्या कामात पैशांची गुंतवणूक करावी, याचा तुम्हाला भविष्यात लाभ होईल. कौटुंबिक जीवनात सुख प्राप्ती होईल. जोडीदारासोबत घरी एखाद्या धार्मिक कार्यकामाच्या आयोजनाबद्दल चर्चा कराल. एकूण विचार करता आजचा दिवस चांगला आहे.
मूलांक 4 – समस्या येतील, त्यातून मार्ग काढाल

मूलांक 4 असलेल्यांना आजचा दिवस अडचणींचा आहे. आज तुम्ही विचार केलेली कामे होता होता बिघडून जातील. व्यापारात आज नुकसान होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होईल. त्यातून जोडीदाराबद्दलही तुमच्या स्वभावात कोरडेपणा राहील. कुटुंबात छोट्या समस्या येतील पण तुम्ही त्यातून मार्ग काढाल.
मूलांक 5 – बदल होणार, सकारात्मक राहा

मूलांक 5 असलेल्यांना आजचा दिवस फार चांगला राहील. तुम्ही विचार केलेली सर्व कामे आज पूर्ण होतील. आज नवीन व्यापार सुरू करण्याबद्दल तज्ज्ञांना विचारा. आज जीवनात बदल होणार आहेत त्याकडे सकारात्मकतेने पाहा. कुटुंबाकडून आज आनंदाची बातमी मिळेल. जोडीदारासोबत संबंध चांगले राहतील, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
मूलांक 6 : कुटुंबाची प्रत्येक निर्णयात साथ

मूलांक 6 असलेल्यांना आज दिवस अनुकूल राहील. व्यापारात तुमच्या योजनांची प्रगती होईल. तुमची सकारात्मक वर्तणूक तुम्हाला प्रत्येक वळणावर साथ देईल. आज व्यापार विस्ताराबद्दल सखोल विचार करू शकता. पण कोणताही निर्णय घेताना जोडीदाराचा सल्ला आवश्य घ्या. कौटुंबिक बाबतीतही आजचा दिवस ठीक आहे. कुटुंबीय तुमच्या निर्णयात तुमच्यासोबत असतील.
मूलांक 7 – वादविविदापासून दूर राहा

मूलांक 7 असलेल्यांना आज त्रासाचा सामना करावा लागेल. आज कोणत्याही सरकारी संस्थेतील कर्मचाऱ्याशी वाद ओढवून घेऊ नका, कारण अहंकारामुळे तुम्ही स्वतःचे काम स्वतः बिघडवून घ्याल असेल वाटत आहे. आज तुम्हाला सल्ला राहील की संयम ठेवा आणि सौम्य भाषेचा वापर करा. कौटुंबिक बाबतीत आज दिवस ठीक राहील. परंतु तुमच्या खराब वर्तणुकीमुळे कुटुंबातील सदस्य नाराज होतील. जोडीदारासोबतही सांभाळून बोला.
8.

मूलांक 9 – कार्यक्षेत्रात नवे मार्ग खुले होणार

मूलांक 9 असलेल्यांना आज दिवस उत्तम असेल. तुमच्या कामात प्रगती असेल. कार्यक्षेत्रात नवीन मार्ग खुले होणार आहात. तुम्ही ऑफिसमध्ये जे काही प्रयत्न करत आहात त्याची जाणीव वरिष्ठांना होईल. नातेसंबंधात थोडी नाराजी असेल पण तुम्ही सगळं काही नीट मार्गी लावणार आहात. तुमची जुनी काही कामं राहीली असतील तर ती त्वरित मार्गी लावा. कामे पूर्ण करण्यासाठी वेळ उत्तम आहे.