Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 17 फेब्रुवारी 2025 : वृषभ राशीच्या कामाचे कौतुक ! मकर राशीचे टेन्शन कमी होणार ! पाहा, तुमचे राशिभविष्य
Finance Horoscope Today 17 February 2025 In Marathi : सोमवार, आठवड्याचा पहिला दिवस असून मेषसाठी प्रगतीचे योग, अचानक धनलाभ आहे
सिंह राशीने यशाचं रहस्य शेअर करू नये. मकर राशीच्या जातकांची धावपळ, टेन्शन कमी होणार तर मीन राशीची सर्व कामे मार्गी लागल्यामुळे दिवस उत्तम आहे. चला तर मेष ते मीन राशीपर्यंत करिअर आणि आर्थिक बाबतीत तुमचा दिवस कसा असेल ते पाहूया.
मेष आर्थिक राशिभविष्य : प्रगतीचे योग, अचानक धनलाभ

मेष राशीसाठी करिअरच्या बाबतीत दिवस चांगला आहे. प्रगतीचे योग असून धनलाभाचे संकेत आहेत. तसेच मान-सन्मानात वाढ होईल. संध्याकाळपासून रात्रीपर्यंतची वेळ तुमच्यासाठी शुभ असेल दरम्यान खर्चात थोडी वाढ होईल. नशीबाची साथ प्रत्येक कामात असेल आणि तुम्ही जे ठरवाल ते काम यशस्वी होईल.
वृषभ आर्थिक राशिभविष्य : कामाची प्रशंसा, योजना यशस्वी होणार

वृषभ राशीसाठी दिवस प्रगती आणि यशाने भरलेला आहे. नशीबाची पूर्णपणे साथ मिळेल त्यामुळे कामे पटापट मार्गी लागलीत. तुमच्या कामाची प्रशंसा झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. कोणत्यातरी सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. तुमचे पेमेंट थांबले असेल तर ते होईल. प्रगतीचे योग असून तुमच्या सर्व योजना यशस्वी होतील. मानसिक समाधान मिळेल.
मिथुन आर्थिक राशिभविष्य : वाद होण्याची शक्यता, सतर्क राहा

मिथुन राशीचे जे जातक व्यापार करतात त्यांना नशिबाची साथ मिळेल आणि मानसन्मात वाढ होईल. घरात किंवा ऑफिसमध्ये वाद होऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. विरोधक तुम्हाला त्रास देऊ शकतात त्यामुळे काही काळ कामात लक्ष लागणार नाही. तुमच्या
हुशारीने आणि मेहनतीने समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला तर कामे सोप्या पद्धतीत मार्गी लागतील. तुमच्य योजना यशस्वी होतील.
कर्क आर्थिक राशिभविष्य : प्रत्येक क्षेत्रात यश

कर्क राशीसाठी करियरमध्ये यश असून तुम्ही प्रत्येक क्षेत्रात नाव कमवणार आहात. सर्व कार्य पूर्ण होतील. जुने वाद आणि वादविवाद संपून जातील. व्यापारात नशिबाची साथ तसेच ऑफिसमध्ये एखादे महत्त्वाचे पद मिळेल. हरवेलली वस्तू सापडेल. धन आणि मानसन्मानाचा योग आहे. गुंतवणुकिचा विचार करा चांगला परतावा मिळेल.
सिंह आर्थिक राशिभविष्य : यशाचं रहस्य शेअर करू नका

सिंह राशीसाठी दिवस प्रगतीने भरलेला असून करियरमध्ये अपेक्षित यश मिळेल. ऑफिसमध्ये सहकारी तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवतील आणि तुमची कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील. मुलांकडून चांगली बातमी समजेल. बाह्य व्यक्तीच्या हस्तक्षेपापासून सावध राहा. तुमच्या यशाचं रहस्य कोणालाही सांगू नका. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका आणि अनावश्यक गोष्टींवर अधिक लक्ष देऊ नका. अन्यथा तुमचं लक्ष कामावरून भटकू शकतं.
कन्या आर्थिक राशिभविष्य : गोंधळाचा दिवस सतर्क राहा

कन्या राशी थोडा गोंधळाचा असेल, तुम्ही नक्की काय करणार आहात किंवा काय करायचे आहे ते समजणार नाही. काही कामे पुढे जाणार आहेत. दरम्यान जी कामे क्रिएटीव्ह आहेत त्यात तुम्हाला उत्तम यश मिळेल. ज्ञान, विज्ञान, कला आणि लेखनात तुम्ही चमकणार आहात. संध्याकाळचा वेळ मजेत आणि आनंदात जाणार आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत शॉपिंगला जाऊ शकता.
तुळ आर्थिक राशिभविष्य : प्रियजनांकडून प्रत्येक कामात मदत

तुळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असून धनलाभाचे योग आहेत. प्रियजनांकडून अपेक्षित सुख आणि प्रत्येक कामात मदत मिळणार आहे. मंगल कार्यात सहभागी होणार आहात. तब्येत सांभाळा तसेच जंक फूड खाणे कमी करा. ऑफिसमध्ये वातावरण ठिक असेल. मेहनत जास्त आहे पण लाभ उत्तम मिळेल.
वृश्चिक आर्थिक राशिभविष्य : रिलोकेशनचा विचार फायनल कराल

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून मुलांच्या बाबतीत थोडं टेन्शन असेल. तुम्ही रिलोकेशनचा विचार पक्का करणार आहात. आर्थिक लाभ होईल, पण खर्च जास्त होतो आहे त्याकडे लक्ष द्या. तुमचे बजेट कोलमडू शकते त्यामुळे सतर्क राहा. विरोधक किंवा शत्रू तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा सावध राहा.
धनू आर्थिक राशिभविष्य : ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुष असतील

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. प्रतिष्ठीत लोकांच्या भेटी होतील ज्यामुळे तुम्हाला भविष्यात लाभ होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्या कामावर खुष असतील. मिळकतीचे अनेक मार्ग खुले होणार आहेत, त्याचा लाभ घ्या. आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी होणार असून तुम्हाला मानसिक समाधान मिळेल.
10 capricorn

11 aquarius

12 pisces
