Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
एरंडोल: येथे इतर ठिकाणांप्रमाणे सर्वञ गुलाबी थंडीची हुडहुडी भरली आहे. थंडीपासुन बचाव करण्यासाठी पहाटे सर्वञ शेकोट्यांवर नागरीकांची गर्दी दिसून येते.
यावेळी अमूक.. अमूक ची न.पा. निवडणुकी साठी जोरात तयारी आहे..!
यासारख्या राजकारणाच्या गप्पांना ऊत आलेला आढळुन येतो.
एरंडोल नगरपालिकेची पंचवार्षिक अंतीम टप्प्यात असुन गेल्या काही दिवसांपुर्वीच काही इच्छुक उमेदवारांनी वाढदिवस,लग्न-साखरपुड्याच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे,अंत्ययाञेत आवर्जून सहभागी होणे,अडचणीत असलेल्या कुटुंबियांना मदतीचा हात देणे, आजारपणासाठी आर्थिक मदत देऊ करणे/मिळवुन देणे.. आदी माणुसकीचे दर्शन घडविणार्या बाबींचा अवलंब केला जात आहे.
जणु ‘मी, .. निवडणुकीला उभा राहणार आहे..! असा संदेश या कृतीतून दिला जात आहे.
या सर्व राजकीय हालचालींच्या दिवसभरातील शेकोट्यांवरील गप्पा रंगतदार ठरत आहेत.
या गप्पांमध्ये ‘तो उभा राहील पण निवडुन येणार नाही, तो आदळणारच…
मागच्या वेळी तो थोड्या मतांनी पडला यावेळी त्याला संधी मिळेल, त्याने लंगोट बांधला पण.. ऐनवेळी तो माघार घेईल..!
विद्यमान नगरसेवकांपैकी कोण-कोण पुन्हा रिंगणात उतरणार..?कोण-कोण आपले नशिब आजमावणार..?
यासारख्या चर्चांना शेकोट्यांवर उब दिली जात आहे.
‘राजकारणाच्या चर्चांमध्ये रमलेल्या मंडळींना गुलाबी थंडीचा काही वेळ विसर पडतो माञ त्यांना भरपूर उब मिळते ती राजकीय हालचालींची,