Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चिमणराव,सरकार आपले आहे,समजून घ्या! हे वाक्य कोणी कोणाला म्हटले?असा प्रश्न महाराष्ट्रात विचारला जात आहे.आरोग्य विभाग,म्हाडा विभागाच्या नोकर भरती परीक्षेत विचारला जात आहे. जेथे आधीच प्रश्नपत्रिका फुटते.प्रश्नपत्रिका फुटली म्हणजे महाराष्ट्र सरकारच्या पापाचे बिंग फुटले.आणि अंडरग्राऊंड वाहाणारी भ्रष्टाचाराची गटार वर रस्त्यावर वाहू लागली.तरीही म्हणतात, आबासाहेब ,”आपले सरकार आहे.समजून घ्या.” हे वाक्य प्रसिद्ध आहे जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे.त्यांनी शिवसेनेचे, एरंडोल मतदार संघाचे आमदार चिमणराव पाटील यांना उद्देशून म्हटले आहे.” आबासाहेब सरकार आपले आहे.समजून घ्या.”जसेच्या तसे लिहीले,काळ,वेळ,स्थान ,अवतरण चिन्हे बरोबर दिलीत तर पुर्ण मार्क.जळगाव जिल्ह्यातील रस्ते,राशन,रेती आणि आता आरोग्य .भ्रष्टाचाराचा महापूर वाहात आहे.आणि जळगाव चे पालकमंत्री आपल्याच पक्षाच्या जेष्ठ,अनुभवी ,उच्च शिक्षीत आमदारांना सांगतात कि,”आबासाहेब सरकार आपले आहे. समजून घ्या.” गुलाबराव ,जरा विस्ताराने सांगा,मोठ्याने सांगा ,जे फक्त चिमणराव पाटील नाही, आम्ही जिल्ह्यातील जनतेला ऐकू येईल.आपले सरकार आहे म्हणजे काय समजून घ्यायचे?राशन मधे १४२दुकाने सील करायची वेळ आली ,चूप बसायचे का?रेतीमाफियांचे थैमान चालू आहे,डंपर खाली माणसे मरत आहेत .चूप बसायचे का?रस्ते उखडून पार खाक झाले. चूप बसायचे का?सिव्हिल हॉस्पिटलमधील श्वास देणारे,ऑक्सिजन देणारे मशीन बोगस घेतले.चूप बसायचे का?कोरोनाने माणसे मरत होती.चूप बसायचे का? असा काही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा शिवसेना आमदारांना आदेश आहे का?कुठेही भ्रष्टाचार झाला तर आपला हिस्सा वाटा काढून चूप बसायचे.तसे असेल तर तो खलिता सुद्धा प्रसारित करा.म्हणजे आम्ही तुम्हाला दोष देणार नाहीत. तुम्हाला प्रश्न करणार नाहीत. जर सरकार चे तसे फर्मान असेल,तर गुलाबराव पाटलांचा काय गुन्हा? ते तर बिचारे ठाकरेंचे सरदार आहेत.सोपवलेली कामगिरी पार पाडत आहेत.जनतेचे आमदार नाहीतच.असते तर त्यांनी चिमणराव आबांना असे सुचवले नसते.आबासाहेब आपले सरकार आहे.हात धुवून घ्या. जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री ची येथपर्यंत मजल गेली,येथपर्यंत हिंमत गेली कि,ते दिनदहाडे ,बिनधास्त सांगतात.हे कसले लक्षण आहे ? एकच ध्येय,सपाटून काम.हे आहे लुटमारपर्व ! यात बिचारे एकटे गुलाबराव जबाबदार नाहीत. हे पुर्वनियोजित मिशन असावे.आपल्याला पुन्हा सत्ता मिळणार नाही.अशी संधी पुन्हा मिळणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करून घ्या.सुदैवाने कोरोना ने आपल्याला साथ दिली आहे.तो आपल्या भल्यासाठी पुन्हा पुन्हा येतो आहे.नाही आला तरी लोकांना सांगा.कोरोना आला,पळा पळा,घरात बसा.लोक घाबरले पाहिजे. आंदोलन नको.मोर्चा नको.कुणाचा आवाज नको.आम्ही सरकार आहोत.आम्ही सुलतान आहोत.आम्ही तालिबान आहोत.
कोरोना ची लाट आपल्या साठी टोळधाड ठरली आहे.आता आपली आर्थिक स्थिती राष्ट्रवादी कंपनीपेक्षा मजबूत झाली पाहिजे. भाजप कंपनीपेक्षा मजबूत झाली पाहिजे.आम्ही कांग्रेस कंपनीला जुमानत नाही.आत्ताच आपण जळगाव ला २७ नगरसेवक विकत घेतले.पुढील वेळेला आमदार विकत घेण्याची क्षमता झाली पाहिजे.हे राज्य शिवसेनेचे आहे.
इकडे परब यांना सांगितले आहे,तुम्ही किहीही करा,कितीही कर्मचारी मेलेत तरी चालतील पण एसटी महामंडळ बंद पडले पाहिजे. आपल्याला शिवशाहीच्या बस चालवायच्या आहेत.एसटी महामंडळाचे खाजगीकरण करायचे आहे.एसटीच्या डेपोच्या जागेत शॉपिंग बांधायचे आहे.ती दुकाने मराठी माणसांना देऊ.मराठी पाट्या लावू.तेथे दुसरे तिसरे काही नाही, फक्त शिवभोजन आणि शिववडा विकता येईल.हे राज्य शिवसेनेचे आहे म्हणावे. रेतीचा धंदा जोरात चालला पाहिजे. वाटल्यास शेतकऱ्यांचे ट्रैक्टर, ट्रॉली उचलून आणा.काही कोणी बोंबा मारणार नाही. मारल्या तरी आधीच पोलिसांना सुचना देऊन ठेवा कि,पालकमंत्री ला विचारल्याशिवाय तक्रार घ्यायची नाही. हाकलून लावायचे.हे राज्य शिवसेनेचे आहे म्हणावे.
राशन जरी गरीबांसाठी असले तरी आम्ही जास्त देतो.जास्तीचे परस्पर विकून टाका.कोणी बोंबलले तर जेलमधे टाका.हद्दपार करा.आपल्या विरोधात कोणीही जिवंत राहायला नको.सांगा,हे राज्य शिवसेनेचे आहे.
रस्त्यांची चिंता करू नका.असेही छत्रपतीँच्या काळात रस्ते नव्हतेच.म्हणून तर घोड्यावर, मेण्यावर बसून जावे लागे.आमच्या पुरते हेलिकॉप्टर आहे.ते हवेत उडते.तर मग,कशाला हवेत रस्ते?जे बनलेत तेच खूप झालेत.जास्त लाड करायचे नाहीत. सुविधा दिल्या कि जनता उरावर बसते.आपल्या विरोधात बोलू लागते.मग,आपल्या सरकार ला धोका होतो.तशी वेळ येऊ देऊ नका. सरकार शिवसेनेचे आहे,म्हणावे.
तुम्हाला सांगून ठेवतो.मी सांगितले तसे केल्यावर लोक माझ्या कडे तक्रार करतील. घाबरू नका.मी आजारी राहीन.कोणालाही भेटणार नाही. काहीच वावणार नाही. काहीच बोलणार नाही. मी कुठे आहे,ते कोणालाही कळणार नाही. लादेन असेच करून लढाई करायचा.पहाडात लपून राहायचा.
मुख्यमंत्री भेटत नाही म्हणून लोक राज्यपालांना भेटतील. तेथे कोणी भेटणार नाही, अशी तरतूद करा.राज्यपालांना सांगा,तुम्ही कोणाला भेटायचे नाही. तुम्ही पर्यायी सरकार चालवायचे नाही. तुम्ही राजभवन मधून बाहेर निघायचे नाही. आमच्या विरोधातील तक्रार ऐकून घ्यायची नाही. ऐकली तरी काहीच कारवाई करायची नाही. येथे आम्ही सरकार आहोत.हे शिवसेनेचे राज्य आहे,म्हणावे.
तुम्ही पवार काकांची चिंता करू नका.आमचे ठरले आहे ,कोणी काय करायचे ते.कोणी काय उचलायचे ते.शिकंदरने सुद्धा सैनिकांशी असेच ठरवले होते.मला भारतावर राज्य हवे.तुम्ही लुट घ्या.म्हणून ते येथपर्यंत येऊन लढले.पवार काका तिकडे इडी चे आक्रमण थोपवून ठेवत आहेत.तोपर्यंतच आपल्याला संधी आहे.दिल्लीचे बादशहा आपल्या वर करडी नजर ठेवून आहेत.सापडले तर एकालाही सोडणार नाहीत.एकेकाला कैदेत टाकतील. पैसे हिसकावून घेतील.काकांनी आधी छगन दादांना बळी दिले होते.आता अनिल दादांना दिले आहे. यादी तयार आहे.त्यात तुमचेही नांव होते.मी कमी करून घेतले.हे भाग्य समजा.
In o तिकडे जळगाव सुभा संपन्न आहे.आपले कोणी छोटे मोठे जहागीरदार, मनसबदार असतील त्यांना सांगा,” खबरदार ! सरकार आपले आहे,समजून घ्या” प्राणचा डॉयलॉग सांगा,” तुम अगर इशारोको समजो,राज को राज रहने दो.”
गुलाबराव असोत कि,सत्तार असोत. किंवा भुसे असोत.तिकडे काहीही करा.मुंबईत तक्रार यायला नको.दिल्लीत खबर व्हायला नको.लोक कितीही मेले तरी चिंता नको.आणि चिमणराव पाटलांना आमचा निरोप सांगा,” चिमणराव ! सरकार आपले आहे. समजून घ्या.”
…शिवराम पाटील.
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच.