Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Coronavirus In Pune: पुण्याला दिलासा; शहरांतील करोना रुग्णसंख्येत मोठी घट

16

हायलाइट्स:

  • पुणे शहर आणि जिल्ह्यात बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक.
  • जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९४६ नवीन करोना बाधितांची भर.
  • १ हजार ६५ रुग्णांची करोनावर मात तर २० जण दगावले.

पुणे:पुणे शहर आणि जिल्ह्यात मंगळवारी बाधितांपेक्षा करोनामुक्त अधिक असल्याचे आढळले. जिल्ह्यात दिवसभरात ९४६ नवीन करोना बाधितांची भर पडली तर १,०६५ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत, तर २० जणांचा मृत्यू झाला आहे. ( Coronavirus In Pune Latest Update )

वाचा: मानापमान नाट्यानंतर पुण्याबाबत बैठक; अजित पवारांनी दिला ‘हा’ शब्द

पुणे शहरात २३२, पिंपरी-चिंचवड मध्ये २७५ आणि ग्रामीण भागात ५५८ रुग्ण असे १,०६५ रुग्ण करोनाच्या आजारातून मंगळवारी बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख २२ हजार ४३९ रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात मंगळवारी ५,३६२ एवढ्या चाचण्या झाल्या असून, त्यापैकी २६८ रुग्ण करोना बाधित आढळले. पिंपरीत २१८ आणि ग्रामीण भागात ४६० बाधित आढळले आहेत. जिल्ह्यात एकूण १० लाख ४९ हजारांहून अधिक जणांना आतापर्यंत करोना संसर्ग झाला आहे.

वाचा: शरद पवार मुख्यमंत्री ठाकरेंच्या भेटीला; चर्चा अनिल देशमुखांबाबत की…

शहरात काही दिवसांपासून दोनशे ते अडीचशे दरम्यान रुग्णसंख्या आढळत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्या पुन्हा घटत असून साडेनऊ हजाराच्या जवळपास ही संख्या राहत आहे. पिंपरीत ११३० तर ग्रामीण भागात ५८६८ सक्रिय रुग्ण असून, जिल्ह्यात एकूण ९,३२६ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत पुण्यात पाच, पिंपरीत चार आणि ग्रामीण भागात ११ अशा २० रुग्णांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. आतापर्यंत मृतांची संख्या ही १७ हजार ८८९ एवढी झाली आहे.

वाचा: ‘लग्नातल्या वरमाईप्रमाणे रुसून बसण्याचा प्रकार पुण्याच्या महापौरांनी बंद करावा’

पुण्यातील मंगळवारची स्थिती

नवीन रुग्ण : २६८
बरे झालेले रुग्ण : २३२
दिवसभरात मृत्यू : ५

पिंपरी-चिंचवडची स्थिती

नवीन रुग्ण : २१८
बरे झालेले रुग्ण : २७५
दिवसभरात मृत्यू : ४

वाचा: टायगर आता काँग्रेसमय झालाय!; नाना पटोले यांचाही शिवसेनेला टोला

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.