Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सोन्याच्या गिन्न्याांचे आमिष दाखवुन एकाला 2 लाख

4

बलढाणा,दि.२२ : – गावाकडे घर बांधकामासाठी पायाचे खोदकाम करताना माझ्या नातेवाईकांना सोन्याच्या दोन किलो गिन्न्या सापडल्या असून त्यांना त्या विकायच्या आहेत. मी तुम्हाला ते कमी भावात मिळवून देतो असे खोटे सांगून नाशिक जिल्ह्यातील तीन जणांना शेंदला तालुका मेहकर येथे बोलून मारहाण करीत त्यांचे 12 हजार रुपये किमतीचे 2 मोबाईल व रोख 2 लाख 65 हजार घेऊन आरोपी फरार झाल्याची घटना 20 ऑगस्ट रोजी घडली होती.याप्रकरणी पोलीसांनी काही तासांतच 2 आरोपींना अटक केली आहे.वाशिम येथील शेषराव घाटोळकर याने नाशिक येथे कामासाठी गेलेला असताना ओळख झालेल्या योगेश दत्तू मोरे रा. नवी धागोर तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक यास माझ्या नातेवाईकाला घर बांधकामासाठी पाया खोदताना 2 किलो सोन्याच्या गिन्न्या सापडल्या आहेत.. व त्यांना विकायचे आहे तुम्हाला घ्यायचे असल्यास कमी भावात द्यायला लावतो असे सांगून एक गीन्नी तेथे आणून दाखविली त्यामुळे त्यांनी ही गोष्ट आपल्या गावातील रमेश सांगळे यांना सांगितल्यानंतर योगेश दत्तू मोरे,रमेश बाबुराव सांगळे व त्यांच्या पुतण्या आकाश किशोर सांगळे व असे तिघेजण 20 ऑगस्ट रोजी स्विफ्ट गाडी क्रमांक MH 15 CT 1933 मधून सोन्याच्या गिनन्या घेण्याच्या उद्देशाने जानेफळ ता.मेहकर येथे पोहोचल्या नंतर बायपास मार्गावर शेषराव घाटोळकर रा.वाशिम याने या तिघांची भेट घेऊन गिन्न्या खरेदी विषयी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या गाडीत बसून शेंदला येथील पारधी वस्ती मध्ये नेऊन आधीच 10 ते 12 अनोळखी इसम बसलेल्या एका घरात नेले तेव्हा सोने घेण्यासाठी पैसे आणले का? पैसे आणले असतील तर कोठे आहेत ते आम्हाला दाखवा असेल म्हणून सोन्याच्या गिन्न्या दाखविल्यानंतर पैसे देतो असे म्हणताच त्या अनोळखी इसमांनी मारहाण करण्यास सुरुवात केली त्यापूर्वी शेषराव घाटोळ हा तिथून निघून गेला होता. मारहाण करताना रमेश बाबुराव सांगळे रा.नवी धागोर ता.दिंडोरी जि.नाशीक यांच्या खिशातील मोबाईल किंमत६ हजार रुपये व नगदी 5 हजार रुपये तसेच योगेश मोरे रा.नवी धागोर ता.दिंडोरी जि.नाशीक यांच्या खिशातील मोबाईल किंमत 6 हजार रुपये 10 हजार रुपये काढून घेतले तसेच मारहाण होत असताना जीवाच्या भीतीने सोबत आणलेल्या स्विफ्ट गाडीमध्ये ठेवलेले 2 लाख 50 हजार रुपये सुद्धा हिसकावून घेण्यात आले. आणि पळून जात असताना उलट धमकी देऊन पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर आमच्या महिलांना छेडछाड केल्याची तुमच्या विरुद्ध तक्रार देऊ अशी दमदाटी सुद्धा केली.. रमेश सांगळे यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला पोहोचून हकीकत सांगितल्यानंतर ठाणेदार राहुल गोंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचत पाहणी केल्यानंतर दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत..

Leave A Reply

Your email address will not be published.