Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
खुन्या मुरलीधर
पुण्यातल्या देवस्थानांची वैशिष्ट्यपूर्ण नावे अनेकांना संभ्रमात टाकतात. ‘खुन्या मुरलीधर’ हे त्यापैकीच एक देवस्थान. उत्तर पेशवाईत सदाशिव नारायण उर्फ दादा गद्रे हे सावकार होते. गद्रेंना दृष्टांत झाला आणि त्यानुसार त्यांनी राजस्थानातील जयपूर येथील प्रसिद्ध शिल्पकार बखतराम याच्याकडून राधा आणि श्रीकृष्ण यांच्या सुंदर मूर्ती घडवून घेतल्या. या देखण्या संगमरवरी मूर्तींची ख्याती सगळीकडे झाली. या मूर्ती शनिवारवाड्यात पाठवाव्यात, असा आदेश दुसरे बाजीराव पेशवे यांनी दिला. गद्रे यांनी रातोरात या मूर्ती सदाशिव पेठेतील बागेत हलविल्या. त्यांच्या रक्षणासाठी अरब सैनिक आणि ब्रिटिश सैनिक उभे केले आणि मूर्तींची प्रतिष्ठापना करायचे ठरवले. १३ एप्रिल १७९७ या दिवशी पहाटे दोन्ही मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. अरब सैनिक आणि ब्रिटिश सैनिक यांच्यात मंदिरासमोर चकमक होऊन त्यात साठ सैनिक मारले गेले. प्रतिष्ठापना सुरू असताना रक्तपात झाला, वा रक्ताचा अभिषेक घडला त्यामुळे या मंदिरास ‘खुन्या मुरलीधर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
Vastu Tips: बाळकृष्ण ते चक्रधर, जाणून घ्या श्रीकृष्णाच्या विविध रुपांचे वास्तुदिशेनुसार कसे लावावे फोटो
मूर्तींचे वैशिष्ट्य
‘खुन्या मुरलीधर मंदिरवास्तूचा संबंध स्वातंत्र्यलढ्याशी आहे. गरुडमंडप, द्वारपालांची चित्रे, अप्रतिम असा लाकडी सभामंडप, मंदिरातले शंभर वर्षांपूर्वीचे घड्याळ, श्रीकृष्ण आणि राधा यांच्या देखण्या संगमरवरी मूर्ती, मंदिर सकाळी ६.३० ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते ८ या वेळेत पाहता येते. जयपूर येथीस बखतराम या कारागिराने साकारलेली श्रीकृष्ण आणि राधेची संगमरवरी मूर्ती पुण्यातल्या देखण्या मूर्तींपैकी एक आहे. मुरलीधराची मूर्ती कोणत्याही आधाराशिवाय एक पाय आणि दुसऱ्या पायाचा अंगठा यावर उभी आहे. तिला प्रभावळ नाही. गाभाऱ्यात दोन सवत्स धेनूंच्या मूर्तीही आहेत. मुरलीधराची मूर्ती एक फूट ११ इंच; तर राधेची मूर्ती साडेआठ इंच उंचीची आहे. मूळ गाभारा आणि मूर्ती स्थापन केलेले सिंहासन एकसंध काळ्या पाषाणाचे आहे.
Krishna Janmashtami 2022 : जन्माष्टमी होणार वृषभ राशीत साजरी, ‘या’ ४ राशींना होईल लाभ