Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिंदेचं भविष्य, फडणवीसांची लाज, भावना गवळींची राखी, ठाकरेंकडून भाजप-शिंदे गटाची चिरफाड!

17

बुलढाणा : बुलढाणा येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटावर जोरदार टीकास्त्र सोडलं. त्यांच्या भाषणातील काही मोजके आणि महत्वाचे १० मुद्दे वाचा एकाच ठिकाणी…

१. काही जुने चेहरे दिसत नाहीत. नितिन देशमुख चांगले शिवसैनिक आहेत, ते परत आले. आज सगळे “काय झाडी काय डोंगर सगळे ओक्के”. ते तिकडे आशीर्वाद घ्यायला गेले, मी जिजाऊंचे आणि तुमचे आशीर्वाद घ्यायला आलोय. काही गेलेत, नितिन आहे, विनायक राऊत आहेत, अरविंद सावंत आहेत. मी पुन्हा त्वेषाने उभा आहे, मी पुन्हा जोमाने उभा आहे आणि मी जिंकणार म्हणजे जिंकणारच.

२. इथल्या ताई मोठ्या हुशार थेट पंतप्रधानांना राखी बांधली फोटो छापून आणला. ही चालूगिरी लोक बघत नाहीयत. भाजप आज आयात पक्ष आहे. यादी काढा मग समजेल किती आयात लोक आहेत. आजही गद्दारांनी सांगावे आम्ही भाजपाच्या टिकिटावर लढणार नाही. त्यांना बाळासाहेब हवेत, चिन्ह हवे मग तुमची मेहनत कुठे आहे?

तुम्ही ज्योतिषाला हात दाखवला, माझ्या शेतकऱ्याने कुणाला हात दाखवायचा? उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
३. छत्रपतींचा वारंवार अपमान करायचा. गुजरात निवडणुकीसाठी उद्योग तिकडे पाठवत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या राज्यातला गावांवर हक्क सांगत आहेत. पुढल्या वर्षी कर्नाटकची निवडणूक आहे. उद्या भाजप महाराष्ट्राचे तुकडे करेल तरीह मिंधे गप्प बसतील. विठोबाला पण कर्नाटकात नेणार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ तिकडे नेणार. मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा आगाऊपणा सहन केला नाही. काळ्या टोपीने अनेकदा अपमान केला.

४. काल अमित शहा बोलले आम्ही धडा शिकवला. पण बाबरी पाडल्यावर शिवसेना उभी राहिली, अमरनाथ यात्रेवेळी शिवसेनाप्रमुख उभे राहिले. आमच्या दैवताचा पुराने आदर्श म्हणून उल्लेख करतात. सत्तारांनी सुप्रिया सुळेंचा अपमान केला. मी मुख्यमंत्री असतो तर लाथ घालून हाकललं असतं. महाराष्ट्राचा अपमान होतोय, देवतांचा अपमान होतोय तुम्ही सहन करता हे असले बाळासाहेबांचे विचार नाहीत.

५. हे ज्योतिषाला हात दाखवत आहेत. आज शहीद दिवस हे नवस फेडायला गेलेत. शेतकऱ्यांसाठी यांच्याकडे वेळ नाही. खोके सरकार गादीवर आले आणि पनवती सुरु झाली. कसला नवस फेडता इकडे शेतकरी दुर्लक्षित होत आहेत. अन्नदाता शेतकरी विचारतो खायचं काय? पंतप्रधान म्हणतात मी दोन तीन किलो शिव्या खातो. तुमचं ठिक आहे शिव्या खाऊन जगता पण शेतकऱ्यांचे काय?, असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी केला.

संजय राऊतांकडून शिंदे गटातील आमदारांचा पुन्हा रेडे असा उल्लेख; पाहा संपूर्ण भाषण

६. देवेंद्रची जनाची नाही मनाची लाज बाळगा. मी आव्हान देतो तुम्ही सत्तेत आहात ना वीज बिल माफ करा. वर वेगळी भाषा खालती उतरले की वेगळी भाषा. पश्चिम विदर्भाचा काही भाग राहिला हे मला माहिती आहे. अतिवृष्टीचे पैसे घोषित झाले किती लोकांना मिळाले चॅनलवाल्यांनी हे दाखवावे. खोटे बोलून रेटून न्यायचे.

७. शिवसेना जिवंत सळसळत रक्त आहे. कितीही फोडा तुम्हाला शक्य होणार नाही. मी तुमच्या भरवशावर आहे पण तुमच्या संकटात उभे राहण्यासाठी आलो आहे. आत्महत्या करायची नाही. लंडनहून तलवार आणून होणार नाही ती पेलणार का?

८. संजय राऊत सारखा मर्द तुरूंगात जाऊन आले तरी सोबत आहेत. हे सगळे गद्दार, तोतये. यांचे कर्तृत्व शून्य. एका व्हिडिओत मुख्यमंत्री शेतीत रमले. शेतातला दुसरा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जाणारा मुख्यमंत्री. चिखल तुडवत जाणारे शेतकरी, कधीतरी डीपी जळते. हे मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने जातात. तुम्ही ज्योतिष्याकडे जातात मग शेतकऱ्याने कुठे जायचे. तुमची सुबत्ता दाखवता मग शेतकरी उपाशी.

९. निवडणुक हारणे जिंकणे सोडून द्या केवळ स्वार्थासाठी गेलात. मनगटात ताकत किती असते हे शेतकऱ्यांनी केंद्राला दाखवून दिले. त्यांना अतिरेकी म्हटले गेले. तुमच्या नांगराची ताकद प्रचंड आहे. आपलं चिन्ह, नाव गोठवलं पण मशाली पेटवल्या मन पेटवलयं.

१०. शिवसेना तुमच्यासाठी रस्त्यावर उतरेल हाथ वर करुन सांगा कितीही संकटे आली तरी आत्महत्या करणार नाही. पदाधिकाऱ्यांना सांगतोय शेतकऱ्यांच्या साठी रस्त्यावर उतरा. केवळ हमीभाव नाही हक्काचा भाव हवा. गद्दारांना धडा शिकवायचा, महाराष्ट्राचा अपमान, महाराजांचा अपमान सहन करायचा नाही.

पडदा पडला! विक्रम गोखले यांचं निधन, २० दिवसांची झुंज अखेर संपली

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.