Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मरीन ड्राइव्ह, हाजी अली मुंबईच्या नकाशावरुन गायब होणार; किनाऱ्यालगतची शहरं गिळणार समुद्र

9

मुंबईः मुंबई, कोच्चि, मँगलोर, चेन्नई, विशाखापट्टनम आणि तिरुवनंतपुरम या शहरातील किनारपट्टी २०३०पर्यंत लहान होत जाईल. तसंच, पुढील आठ वर्षात समुद्राचा जलस्तर वाढणार असून जमिन गडप होईल. इतकंच नव्हे तर, काही लोकांना आपला व्यवसाय, घर सोडून स्थलांतर करावं लागेल. तर, २०५० पर्यंत समुद्र किनाऱ्यावरील शहरांना असलेला धोका तीनपट वाढणार आहे. जगातील समुद्र किनाऱ्या लगतची अनेक शहरे समुद्र गिळंकृत करणार आहे. यात भारताची आर्थिक राजधानी मुंबईचाही समावेश आहे. एका अहवालातून ही धक्कादायक बाब स्पष्ट झाली आहे.

मुंबईतील कमीतकमी एक हजार इमारतींना समुद्राच्या वाढत्या जलस्तराचा फटका बसणार आहे. कमीत कमी २५ किलोमीटर लांबीचे रस्ते खराब होणार आहेत. ज्यावेळेस हाय-टाइड येईल तेव्हा २४९० इमारती आणि १२६ किलोमीटर लांब रस्ते पाण्याखाली जातील. RMSI या संस्थेने या वर्षी जुलैमध्ये सादर केलेल्या एका अहवालातून या धक्कदायक बाबी समोर आल्या आहेत.

वाचाः मुंबै बँक घोटाळा प्रकरण: प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट

मुंबईतील हाजी अली दर्गा, जवाहर लाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे सी लिंक, मरीन ड्राइव्हचा क्वीन नेकलेस ही प्रसिद्ध ठिकाणे समुद्राच्या पोटात असतील. ही ठिकाणे पाण्याखाली जाण्याच्या मार्गावर आहेत, असं या अहवालात नमूद केलं आहे. तर, RMSI ने हे विश्लेषण IPCCच्या सहाव्या क्लायमेट अॅसेसमेन्ट रिपोर्टवरुन केलं आहे. फक्त मुंबईच नव्हे तर समुद्राच्या वाढत्या जलस्तराचा फटका कोच्ची, मँगलोर, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरमला देखील बसणार आहे.

वाचाः पुणे, औरंगाबादनंतर मुंबईतही रिक्षा चालक संपाच्या तयारीत; मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

पृथ्वी मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, उत्तरेकडील हिंद महासागरचा जलस्तर १८७४ -२००४ मध्ये प्रत्येक वर्षी १.०६ ते १.७५ मिलीमीटरच्या वेगाने वाढत आहे. १८७४ साल ते २००५ पर्यंत विचार केल्यास हिंद महासागर जवळपास एक फुट वर आला आहे. समुद्राचा जलस्तर वाढण्यामागे ग्लोबल वॉर्मिंग हे एक मुख्य कारण आहे. तापमान वाढीमुळं येत्या काही काळात वादळांच्या संख्येतही वाढ होऊ शकते. पश्चिम किनारपट्टीवर गेल्या चार वर्षांपासून चक्रीवादळांच्या संख्येत ५२ टक्के वाढ झाली आहे. २०५० मध्ये तापमानात २ डिग्री सेल्सिअस वाढ झाली. तरी देखील चक्रीवादळ आणि वादळांच्या संख्येत तीन पटीने वाढ होईल.

वाचाः मोठी बातमी! प्लास्टिक वापरावरील निर्बंध शिथिल; सिंगल युज प्लास्टिकच्या ‘या’ वस्तू आता वापरता येणार

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.