Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सात वर्षांपासून भोगतोय न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा, जिच्यामुळे तुरुंगात गेला ती जिवंत सापडली

7

अलीगढः अलीगढमध्ये एक चक्रावून टाकणारे प्रकरण समोर आलं आहे. सात वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीची अपहरण करुन हत्या करण्यात आली. हत्याप्रकरणात तिच्या घराशेजारीच राहणाऱ्या विष्णुला अटक करण्यात आली. कोर्टात केस उभी राहिली आणि त्याला शिक्षादेखील झाली. गेल्या सात वर्षांपासून तो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. मात्र, आता जिच्या हत्येच्या आरोपाखील विष्णु शिक्षा भोगत आहे तिच मुलगी आता जिवंत असल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

१७ फेब्रुवारी २०१५मध्ये १०मध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी गावातीच विष्णु नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त केला जात होता. अनेक महिने शोध घेतल्यानंतर आग्रा येथे एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. कपड्यांवरुन तिच्या वडिलांनी ही आपलीच मुलगी असल्याचं पोलिसांना सांगितलं. त्यानंतर विष्णुवर हत्येचा आरोप करण्यात आला होता.

वाचाः चंद्रपूरः न्यायालयासमोरच तरुणीने संपवले जीवन, भल्या पहाटे गेटवरच…

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले आणि हत्या करुन पुरावे नष्ट केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली. २५ सप्टेंबर २०१५ साली त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यानंतर विष्णुला जेलमध्ये जावे लागले. मात्र, एकीकडे त्याच्या कुटुंबीयांनी बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीची माहिती काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना ती मुलगी जिवंत असून आता तिच वय २१ वर्ष असल्याची माहिती मिळाली. तरुणी जिवंत असल्याने विष्णुच्या आईने पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

वाचाः पुण्यातील दरे पुलावर मध्यरात्री ट्रेलरचा विचित्र अपघात; चालक आतमध्येच अडकला अन्…

विष्णूच्या आईला काही जणांनी ती तरुणी जिवंत असल्याची माहिती दिली. हाथरस येथे राहत असून तिने तिथे संसार थाटला आहे. तिला दोन मुलंदेखील आहेत, असा दावा करण्यात आला आहे. विष्णूच्या आईने ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी पुन्हा या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हाथरसमध्ये जाऊन मुलीला चौकशीसाठी अलीगढला आणलं असून न्यायालयात हजर केलं आहे. तिचा जबाब नोंदवून घेतला आहे. मुलीची डीएनए चाचणी करावी, अशी मागणी विष्णूच्या कुटुंबीयांनी केली आहे.

वाचाः पुणेः सतत संशय घ्यायचा, नंतर दोघांमधले वाद टोकाला गेला; इंजिनीअरने पत्नीला कायमचे संपवले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.