Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘बीजमाता’ राहीबाई पोपेरेंचं भाषण अर्ध्यावर थांबवलं, मोदींवरील टीकेनंतर आयोजकांची सूचना

16

नागपूर : ‘बीज माता’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘पद्मश्री’ विजेत्या राहीबाई पोपेरे यांना महिला विज्ञान काँग्रेसच्या उद्घाटन सत्रात अचानक भाषण आटोपते घेण्यास सांगण्यात आले. राहीबाईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह काही नेत्यांवर टीका केल्याने ‘बीजमाते’ला थांबवण्यात आलं.

आपल्या गावाला भेट देण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या वचनाची आठवण पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेले असताना करुन दिली. अहमदनगर जिल्ह्यातील कोंभळणे या गावातील गरीब परिस्थितीची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली होती, असं राहीबाईंनी सांगितलं.

इंडियन सायन्स काँग्रेसअंतर्गत गुरुवारी फार्मर्स सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले होते. राहीबाई पोपेरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.

अनेक दशकांपासून देशी बियाणांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी भारताची ‘बीज माता’ म्हणून राहीबाई पोपेरे यांना ओळखले जाते. भाषण थांबवण्यास सांगेपर्यंत त्यांचे वीस मिनिटांचे संबोधन झाले होते.

‘रासायनिक खतांचा अतिवापर केल्याने पीक उत्पादन वाढत आहे. मात्र, यामुळे मातीची क्षमता घटते आहे. मातीच नसेल तर पुढची पिढी काय करेल? ही समस्या टाळण्यासाठी गावठी बियाणे हाच रामबाण उपाय आहे’ असे मत बीजसंकलन क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम करणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले.

मंचावर सेंट्रल इनलँड फिशरीज रिसर्च इन्स्टिट्युट, कोलकाताचे संचालक डॉ. बसंतकुमार दास, माफसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालय, नागपूरचे सहयोगी अधिष्ठाता प्रकाश कडू, इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांची उपस्थिती होती.

‘विषमुक्त पिकांसाठी गावठी बियाणांच्या वापरावर जोर देण्याची आवश्यकता आहे. बाजारात मिळणारे हायब्रीड बियाणे दरवर्षी घ्यावे लागतात. त्या तुलनेत राखड किंवा शेणात संरक्षित ठेवलेल्या गावठी बियाणांचे आयुष्य तीन वर्षे असते. प्रत्येक शेतात गावठी बियाणांचा वापर झाल्यास मातीची क्षमता टिकून राहील. यामुळे कुठल्याही खतांची गरज मातीला लागणार नाही आणि पिके केवळ मातीच्या जोरावर बहरतील’, असे पोपेरे यांनी यावेळी सांगितले.

माफसूचे संचालक डॉ. आशिष पातुरकर यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी शेती आणि साहाय्यक व्यवसाय यांचा समन्वय साधण्यावर जोर दिला. बदलत्या हवामानानुसार पीकपद्धती कशी बदलावी, याचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना द्यावे, ड्रोन आणि नॅनो तंत्रज्ञानाचा शेतात वापरावे, असा सल्ला कडू यांनी दिला. उद्घाटनानंतर शेतकरीविषयक चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.

हेही वाचा : राणेंनी माझ्या नादाला लागू नये, मी तुमची आर्थिक प्रकरणं बाहेर काढली तर ५० वर्षे तुरुंगात खितपत पडाल: राऊत

एकात्मिक शेतीकडे वळा!

शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी कुटुंबशेती, एकात्मिक शेतीकडे वळण्याची आवश्यकता आहे. शेती विषयाच्या शास्त्रज्ञांनी देशातील गावांमध्ये जाऊन काम केल्यास शेतकऱ्यांची समृद्धी होईल. कापणीनंतरचे नुकसान, ई-मार्केटिंग या विषयावर गंभीरपणे चिंतन व्हावे, असे डॉ. बसंतकुमार दास म्हणाले.

हेही वाचा : ठाकरे गट, राष्ट्रवादी, रासप ते MIM; ३० नगरसेवकांचा शिंदे गटात पक्षप्रवेश

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.