Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये दारू पिऊनही नो एन्ट्री, मद्यधुंद तरुणांना विमानतळावरच रोखलं…

12

नवी दिल्ली : फ्लाईटमध्ये महिलेवर लघुशंका केल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवारी संध्याकाळी दिल्ली-पाटणा इंडिगो फ्लाइटमध्ये (Delhi-Patna IndiGo flight) प्रवास करणाऱ्या दोन तरुणांना पाटणा विमानतळ पोलिसांनी सुरक्षा दलाच्या (CISF) मदतीने अटक केली आहे. गंभीर म्हणजे दोन्ही प्रवासी हे विमानात मद्यप्राशन करून चढल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण बिहारमध्ये दारूबंदी आहे. अशात कोणी दारू पिऊनदेखील बिहारमध्ये प्रवास करायचा नाही, असा नियम आहे. यामुळे विमान पाटण्याला उतरताच त्यांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती होती. पण यानंतर दोन्ही तरुणांकडून ५-५ हजारांचा दंड वसूल केल्यानंतर त्यांनी सोडून देण्यात आलं.

मिळालेल्या माहितीनुसार , हा प्रवास ८० मिनिटांचा होता. यावेळी दोघेही मोठ्या आवाजात बोलत होते. त्यांना शेवटच्या सिटावर बसवण्यात आलं पण तरीदेखील ते गोंधळ घालत असल्याची माहिती आहे. नितीश कुमार आणि रोहित कुमार अशी आरोपींची नावं आहेत. तर हे दोघे फ्लाइट 6E-6383 ने प्रवास करत होते. दोन्ही प्रवाशांवर फ्लाइटमधील केबिन क्रू मेंबर्सची नजर होती.

मुंबईकरांनो सावधान! पुढचे दोन तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे, आताच लक्षात घ्या काय आहे धोका…
नितीश आणि रोहित हे दोघेही दारू पिऊन आल्याचं लक्षात येताच विमानतळावरील सीआयएसएफ अधिकार्‍यांना ही माहिती दिली. विमान उतरल्यावर सीआयएसएफच्या अधिकाऱ्यांनी दोघांना पाटणा पोलिसांच्या ताब्यात दिलं. एअरलाइन्स मॅनेजरने दिलेल्या तक्रारीवरून विमानतळ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

‘दिल्ली-पाटणा फ्लाइटमध्ये मद्यधुंद अवस्थेत प्रवास करणाऱ्या दोघांना आम्ही अटक केली आहे. दोघेही पाटणा विमानतळावर उतरले तेव्हा मद्यधुंद अवस्थेत होते. इतकंच नाहीतर त्यांच्या सामानातून दारूचा वास येत होता’ अशी माहितीही पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पुणे : मुलीला शाळेत सोडलं ते अखेरचं! घरी परतताना शिक्षक महिला थेट ट्रकखाली आली अन्…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.