Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ओंकार आणि ईशाला एकत्र पाहणं आपल्यासाठी नवा अनुभव होता असं त्याने म्हटलं आहे. नुकत्याच एका युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत ऋषीने ओंकार आणि ईशा यांच्या इंटिमेट सिनवर भाष्य केलं आहे. त्या सिनबद्दल बोलताना ऋषी म्हणाला, ‘मी त्यांना पाहिलं. मोठ्या पडद्यावर त्यांना एकत्र पाहणं खूप छान होतं. ते गाणं आणि ट्रेलर दोन्हीही मला खूप आवडलं. खरं सांगायचं तर मला ईशा खूप आवडली. मी तिच्याकडेच पाहत होतो. आता ओंकारला बघण्यासाठी मला ते पुन्हा पाहावं लागेल. ईशा खूप चांगली दिसलीये. मोठ्या पडद्यावर त्यांना पाहताना मी हसून फक्त तिच्याकडेच पाहत होतो’, असं तो म्हणाला. आपल्या गर्लफ्रेंडला मोठ्या पडद्यावर पाहून आपल्याला आनंद झाला असं त्याने म्हटलं.
‘सरला एक कोटी’ हा चित्रपट २० जानेवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात ईशा आणि ओंकार यांच्यासोबतच छाया कदम, कमलाकर सातपुते, रमेश परदेशी, वनिता खरात, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम, अभिजीत चव्हाण, यशपाल सरताप, जतीन ईनामदार, महेंद्र खिल्लारे, रमाकांत भालेराव, कपिल कांबळे, शाम मते, शुभम खरे, योगेश इरतकर, अभिलाषा पॉल यांच्या मुख्य भूमिका आहेत. “सरला एक कोटी’’ या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनेक पुरस्कारप्राप्त चित्रपट ‘आटपाडी नाईट्स’चे नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे.