Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ग्राहकांची चांदी! Nothing Phone (1) स्मार्टफोन १० हजारांनी झाला स्वस्त

8

नवी दिल्लीः Nothing Phone (1) स्मार्टफोन लाँचिंगपासून चर्चेत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे या फोनमध्ये दिलेली डिझाइन. या फोनच्या डिझाइनची खूपच चर्चा झाली आहे. परंतु, किंमत जास्त असल्याने अनेक जण या फोनला खरेदी करू शकत नव्हते. परंतु, आता तुम्ही या फोनला डिस्काउंट सोबत खरेदी करू शकतात. जाणून घ्या या फोनवर मिळणाऱ्या डील्ससंबंधी.

Nothing Phone (1) ला Flipkart वरून सहज खरेदी करू शकता. या फोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. तुम्ही या फोनला १७ टक्के डिस्काउंट नंतर ३२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत या फोनवर तुम्हाला अनेक बँक ऑफर्स सुद्धा मिळतात. Federal Bank Debit आणि Credit Card वरून पेमेंट केल्यास तुम्हाला १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. ही ऑफर HSBC Credit Card वर सुद्धा सुरू आहे.

वाचाः Croma Sale: ४३ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर थेट ७ हजाराचा डिस्काउंट, पाहा ऑफर

कंपनीकडून या फोनवर १ वर्षाची वॉरंटी मिळते. हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी रॅम ऑप्शन सोबत येतो. आज ऑर्डर केल्यास तुम्हाला हा फोन २ दिवसात डिलिव्हर केला जाईल. या फोनमध्ये ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. याशिवाय, या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा दिला जातो. याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे.

वाचाः भारतातील या दोन तरुण हॅकर्सनं करून दाखवलं, गुगलकडून जिंकले रोख २२ हजार डॉलर्सचे बक्षीस

जबरदस्त फ्रंट कॅमेराचा स्मार्टफोन सर्च करीत असाल तर हा फोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो. कारण, यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जातो. फोनमध्ये 4500 mAh ची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ Processor दिला असल्याने फोनची स्पीड जबरदस्त आहे.

वाचाः जिओच्या या प्लानसमोर सगळेच फेल, कमी किंमतीत मिळतोय २.५ जीबी डेटा व अनलिमिटेड कॉलिंग

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.