Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

SPPU Job: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

8

SPPU Job: नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पदभरती अंतर्गत त्यांना चांगल्या पद आणि पगाराची नोकरी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर माहिती जाहीर करण्यात आली असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठात डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना पुणे येथे काम करावे लागणार आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६ हजार ते १६ हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे.

MPSC Job: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आतापर्यंतची सर्वात मोठी भरती, जाणून घ्या तपशील
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

पदासाठी इच्छुक उमेदवारांना अप्रेंटसशिप इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करताना तुमचे नाव, पत्ता, शैक्षणिक पात्रता आणि इतर महत्वाचा तपशील भरावा. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

IB Recruitment 2023: देशाच्या गुप्तचर विभागात बंपर भरती, दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.