Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हळदी समारंभात नवदांपत्यानं केली मौजमजा
अथियानं तिच्या इन्स्टाग्रामवरून हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोंमध्ये अथिया, राहुल आणि त्यांच्या घरातील मंडळी दिसत आहेत. या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह दिसत आहे. एका फोटोमध्ये अथिया आणि राहुल एकमेकांकडे अतिशय समाधानानं आणि आनंदानं हसताना दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्याला आणि हाताला हळद लागलेली दिसत आहे. तर आणखी एका फोटोमध्ये अथिया खळखळून हसताना दिसत आहे. तर तिसऱ्या फोटोमध्ये अथिया तिचा भाऊ अहान याला हळद लावताना दिसत आहे.
आणखी एका फोटोमध्ये अथिया खूपच सुंदर दिसत आहे. त्या फोटोमध्ये तिच्या माथ्यावर मोठ्ठी बिंदी आणि आकर्षक कानातले घातलेले दिसत आहे. हे फोटो शेअर करत अथियानं सुख इतकंच लिहिलं आहे. परंतु त्यावरून तिच्या मनातील सर्व भावना व्यक्त होत आहेत.
अथियानं हळदीचे फोटो शेअर केल्यानंतर लगचेच तिचे वडील आणि अभिनेते सुनील शेट्टी यांनी कॉमेन्ट मध्ये हार्ट इमोजी शेअर केली आहे. अथियाची सर्वात जवळची मैत्रिण कृष्णा श्रॉफ हिनं देखील हार्टचा इमोटिकॉन शेअर केला आहे.
अथिया शेट्टी आणि केएल राहुल याचा लग्नसोहळा सुनील शेट्टीच्या खंडाळा इथल्या आलिशान फार्महाऊसमध्ये झाला. या विवाहसोहळ्याला दोघांच्या घरचे मंडळी आणि निवडक मित्रमंडळी उपस्थित होते. दरम्यान, अथिया आणि राहुलच्या लग्नाचे फोटो सुनील शेट्टी आणि तिचा भाऊ अहान यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अथिया आणि राहुल हे एकमेकांना चार वर्षे डेटिंग करत होते. अथिया आणि राहुलच्या लग्नाचं रिसेप्शन आयपीएल समान्यांनंतर होणार असल्याची माहिती खुद्द सुनील शेट्टी यानं दिली होती.