Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
प्रेक्षकांनी ‘गंगुबाई’ला आहे तसं स्वीकारलं… बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर निर्मिती सावंत यांचं उत्तर मन जिंकणारं!
हे वाचा-कैलाश खेरवर कर्नाटकमध्ये हल्ला, कॉन्सर्ट दरम्यानच घडला सारा प्रकार
२०२१ मध्ये हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा सिनेमात निर्मिती यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यावेळी निर्मिती सावंत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉडी शेमिंगविषयी भाष्य केले. त्यांना विचारण्यात आलेले की, अलीकडेच एका अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केले होते, त्यानंतर बॉडी शेमिंगचा मुद्दा उपस्थित झाला. अशावेळी बॉडी शेमिंगबाबत तुमचा काही अनुभव आहे का? सडपातळ असता तर वेगळ्या भूमिका मिळाल्या असत्या असं वाटतं का?
या विषयावर बोलताना निर्मिती सावंत यांनी उत्तर दिलं की आपण जशा आहोत अगदी तसंच प्रेक्षकांनी आपल्याला स्वीकारलं. त्यामुळे बॉडी शेमिंगचा असा अनुभव आलेला नाही. निर्मिती पुढे म्हणाल्या की, ‘बारीक असणाऱ्या कितीतरी अभिनेत्री आहेत ज्या सर्व प्रकारच्या भूमिका करू शकतात. पण माझ्यासारख्या खूप कमी आहेत ज्या सर्व प्रकारच्या भूमिका करू शकतात.’ निर्मिती यांचे असे सकारात्मक उत्तर नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.
हे वाचा-खोटं होतं प्रियांका- शिवचं भांडण? रात्रीच्या प्लॅनिंगचा Video Viral
या मुलाखतीमध्ये निर्मिती म्हणाल्या की, ‘मी खूप सकारात्मक व्यक्ती आहे. काही गोष्टी घडल्यानंतर त्याचं दु:ख करण्यापेक्षा, त्यातून एखादी तरी चांगली गोष्ट आपल्याला मिळते. ती उचलून पुढे जात राहणं आवश्यक आहे आणि हे मी शिकले’.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास निर्मिती सावंत यांचा बहुचर्चित सिनेमा ‘झिम्मा’चा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झिम्मा २ चा टीझर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला. ज्यामध्ये निर्मिती आणि अभिनेते अनंत जोग पुन्हा एकदा मजेशीर संवाद करताना दिसले. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. झिम्मा या सिनेमाने करोनाचा खडतर काळ संपल्यानंतर प्रदर्शित होत प्रेक्षकांचे मनोरंजन केलेले. १०० हून अधिक दिवस हा सिनेमा थिएटरमध्ये होता.