Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सीमा तुझ्या मांडीवर श्वास सोडायचा आहे… रमेश देवांनी व्यक्त केलेली काळजात चर्रर करणारी इच्छा

12

मुंबई: मराठी मनोरंजन विश्वातील दिवंगत ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांची ३० जानेवारी रोजी जयंती. गेल्यावर्षी २ फेब्रुवारी रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र त्यांच्या आठवणी आजही ताज्या आहेत. रमेश यांचे त्यांच्या पत्नी सीमा देव यांच्याशी असणारे नाते अत्यंत घनिष्ठ होते. केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही एक आदर्श जोडपे होते. दरम्यान आज देव यांच्या वाढदिवशी त्यांच्या पत्नीसोबतचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये ते त्यांच्या मृत्यूविषयी भाष्य करतायंत. चाहत्यांचे मन हेलावून टाकणारा हा व्हिडिओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

हे वाचा-प्रेक्षकांनी ‘गंगुबाई’ला आहे तसं स्वीकारलं! बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर निर्मिती सावंत म्हणाल्या…

रमेश आणि सीमा देव यांनी टीव्ही९ मराठीला एक मुलाखत दिली होती. सोशल मीडियावर या मुलाखतीमधील एक व्हिडिओ व्हायरल होत असून यावेळी देव यांनी केलेलं भाष्य मन हेलावून टाकणारे आहे. रमेश देव यांची एक इच्छा होती आणि ती त्यांनी सीमा यांच्यासमोर व्यक्त केली. ते म्हणाले होते की, ‘लग्नाची ५३ वर्ष आणि त्याआधीची चार ते पाच वर्ष आपण एकमेकांना ओळखत आहोत. इतकी वर्ष तू मला साथ दिलीस, आता माझी एक इच्छाही पूर्ण कर. मी ९३ वर्षांचा आहे, त्यामुळे कधी जाईन काही माहीत नाही.’ रमेश देव अशाप्रकारे भावुक झाल्यानंतर सीमी देव त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याही डोळ्यात पाणी तरळते.

यावर रमेश देव पुढे म्हणतात की, ‘माझी एकच इच्छा आहे की माझा शेवटचा श्वास तुझ्या मांडीवर जावा. माझी तेवढी इच्छा तू पूर्ण कर.’ देव यांचं वाक्य नक्कीच भावुक करणारं होतं. रमेश देव यांनी अशी इच्छा व्यक्त करण्यामागचं प्रेम स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. यावेळी आसवं रोखत सीमा त्यांना धीर देतात आणि असं काही होणार नाही असा विश्वास देतात. सीमा यांना रडताना पाहून रमेश देव अत्यंत सामंज्यसाने परिस्थिती हाताळतात. नव्वदीनंतरही या जोडप्यामध्ये जे सामंजस्य आणि प्रेम होतं, ते तरुण पिढीला नक्कीच प्रेरणा देणारं आहे.

हे वाचा-रमेश देव यांच्या एका वाक्यावर सारंकाही ऐकायच्या सीमा देव

पत्नीची समजूत काढण्यासाठी रमेश पुढे म्हणतात की, ‘अगं कधी ना कधी सगळ्यांनाच जायचं आहे. तू किंवा मी अजरामर होऊन आलो आहोत का? पण माझी ती इच्छा भयंकर आहे की संपूर्ण आयुष्य जिच्यासोबत घालवलं तिच्या मांडीवर अखेरचा श्वास घ्यावा.’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.