Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्याआधीच अरुंधतीच्या लग्नात मोठं विघ्न! आशुतोषला होकार देऊनही…

6

मुंबई: टीआरपी रेसमध्ये टॉप १० मध्ये स्थान कायम असणारी मालिका ‘आई कुठे काय करते’ नेहमी चर्चेत असते. या मालिकेतील पात्रांविषयी आणि कथानकाविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायम उत्सुक असतात. शिवाय आगामी भागात काय होणार हेही प्रेक्षकांना जाणून घ्यायचे असते. दरम्यान अलीकडच्या एपिसोडमध्ये अनघाच्या बाळाचे बारसे दाखवण्यात आले. या कार्यक्रमासाठी मालिकेतील सर्वच पात्र नटून-थटून उपस्थित होते. अरुंधतीने या चिमुरडीचं नाव ‘जानकी’ ठेवलं. दरम्यान या कार्यक्रमात अरुंधतीच्या लग्नाचा मुद्दा उपस्थित झाला आणि मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आला आहे.

हे वाचा-सीमा तुझ्या मांडीवर श्वास सोडायचा आहे… रमेश देवांनी व्यक्त केलेली इच्छा

देशमुखांच्या घरामध्ये अनघाच्या लेकीच्या बारशाचा कार्यक्रम सुरू असतो. यावेळी अरुंधतीसह सर्व देशमुख कुटुंबीय उपस्थित असतात. आशुतोष, त्याची आई आणि मित्रही कायक्रमात हजरी लावतात. आता या कार्यक्रमात अरुंधतीच्या लग्नाचा विषय निघतो. अरुंधती आणि आशुतोष यांच्यातील वाढती जवळीक पाहताना अनिरुद्धचा होणारा जळफळाटही यावेळी दाखवण्यात आला. मात्र प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा नवे वळण मालिकेत लवकरच पाहायला मिळणार आहे.

मालिकेच्या आगामी भागाचा एक व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आला आहे. ज्यात आप्पा सर्वांसमोरच हात जोडून आशुतोषला विचारतात की, ‘तुम्ही अरुंधतीशी लग्न करायला तयार आहात का? यावर आशुतोष तातडीने होकार देतो. त्याच्या होकाराचे ऐकून घरातील काही सदस्य तर आनंदी होतात, मात्र कांचन रागानेच आप्पांना विचारतात की, ‘हे तुम्ही काय बोलताय? या वयात लग्न करणं शुद्ध वेडेपणा आहे’. मात्र अप्पांनीही अरुंधतीच्या लग्नाचं मनावर घेतलं होतं.

हे वाचा-प्रेक्षकांनी ‘गंगुबाई’ला आहे तसं स्वीकारलं! बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर निर्मिती सावंत यांचं उत्तर जिंकेल मन

आप्पा वैतागून कांचन यांना म्हणतात की, ‘कांचन आज जर तू अरुंधतीच्या लग्नाला तयार नसशील ना…’ आप्पा त्यांचे वाक्य पूर्णही करत नाहीत आणि ते खाली कोसळतात. आप्पा चक्कर येऊन कोसळल्याने संपूर्ण देशमुख कुटुंबीय त्यांच्या जवळ धावत पोहोचतात. आप्पांना अशाप्रकारे चक्कर येणं अरुंधतीच्या लग्नामध्ये येणारा नवा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. कारण आप्पांनी नेहमीच अरुंधतीला पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांना काही झाल्यास अरुंधतीसमोर मालिकेत नवी आव्हानं उभी राहण्याची शक्यता आहे.


आप्पांना नेमकं काय झालं? यातून देशमुख कुटुंबीय कसे सावरतील आणि आशुतोष या सर्वामध्ये अरुंधतीला कशी साथ देईल? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागामध्ये मिळतील.



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.