Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

हजारे दाम्पत्य रील्समुळं रातोरात हिट झालं, वाईट नजर पडली अन् मेहनतीवर पाणी फेरलं

20

बीड: बीड जिल्ह्यातील एक ऊसतोडणी करणाऱ्या दाम्पत्यचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ऊस तोडणी करणाऱ्या मनिषा हजारे आणि अशोक हजारे यांनी एक स्मार्ट फोन विकत घेऊन इन्स्टाग्राम रील्स करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी ४०० पेक्षा अधिक व्हिडिओ अपलोड केले होते. या दाम्पत्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि हे दाम्पत्य चर्चेत आलं. रातोरात अनेकांच्या स्टेटसला या दाम्पत्याचे व्हिडिओ झळकू लागले. शोध घेतल्यानंतर हे दाम्पत्य बीड जिल्ह्यातील असून सध्या कर्नाटकमध्ये ऊस तोडणी करत असल्याचं समोरं आलं होतं. मात्र, त्यांच्या यशावर वक्रदृष्टी पडली. अशोक हजारे यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्यात आलं, त्यावर वादग्रस्त व्हिडिओ अपलोड केले.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील एक ऊसतोडणी करणार कुटुंब इन्स्टाग्रामवर रील्स अपलोड करत होतं. त्यांनी केलेले काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्या व्हिडिओला महाराष्ट्रतील जनतेने पसंती दिली. एका रात्रीतच हे हजारे कुटुंब महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं जणू काही स्टार झाल्यासारखं त्यांच्या अवतीभवती वातावरण देखील निर्माण झालं. अत्यंत हलाखीच्या आणि गरिबीच्या परिस्थितीत ऊस तोडणी करणारे हे कुटुंब प्रसिद्ध झालं. अनेक जण कर्नाटकात असलेल्या एका कारखान्यावर त्यांना भेटून सेल्फी काढण्यासाठी या ठिकाणी जात होते.

राज ठाकरे-सुधीर मुनगंटीवार आमनेसामने, विचारपूस करत खेळीमेळीने साधला संवाद

मनिषा हजारे आणि अशोक हजारे दाम्पत्याची प्रसिद्धी समाजकंटकांना बघवली नाही. अशोक हजारे यांचं अकाऊंट त्याने हॅक करून समाजामध्ये चुकीचा मेसेज जाईल अशा पद्धतीने व्हिडिओ पोस्ट केले. यातून हजारे दाम्पत्याच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामुळं हजारे दाम्पत्याला धक्का बसला.

शिंदे सरकारचं शेतकऱ्यांना नववर्षाचं गिफ्ट, दुधाळ जनावरांच्या खरेदी किंमतीत २० ते ४० हजारांची वाढ

ज्या कुटुंबाला साध्या मोबाइल व्यतिरिक्त दुसरा मोबाइल माहिती नव्हता. त्यांनी स्मार्टफोनच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर रील्स केले. त्यातून ते व्हायरल झाले आणि प्रसिद्धी मिळाली. मात्र, अकाऊंट हॅक झाल्यानं मनिषा हजारे आणि अशोक हजारेंना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं आहे. हजारे दाम्पत्याच्या मदतीला समाजातील चांगल्या व्यक्ती देकील धावल्या. इन्स्टाग्राम अकाऊंट वरील पोस्ट हटवत इतर मुला मुलींनी त्यांना या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून दिल्याने त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. चुकीचे फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले जात असल्यानं हजारे दाम्पत्यानं भलतंच टेन्शन घेतलं होतं. इन्स्टाग्रामचा वापर करणाऱ्या इतर यूजर्सनी त्यांची मदत केल्यानं त्यांचं टेन्शन दूर झालं.

Maharashtra Song: महाराष्ट्राचं राज्यगीत गाताना ‘या’ गोष्टींचे भान नक्की बाळगा, काय आहेत नियम?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.