Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कहर! नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बायकोवर अत्याचार, सात दिवसापासून त्रास देत आहेत सासरचे

13

मुंबई- बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी सध्या त्याच्या दाक्षिणात्य सिनेमांतील पदार्पण आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे तो व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या पायऱ्या चढत आहे तर दुसरीकडे त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी संपण्याचं नाव घेत नाहीत. त्याची पत्नी आलिया सिद्दीकीच्या वकिलाने अभिनेता आणि त्याच्या कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

याआधी नवाजुद्दीनच्या आईने तिची सून आलियाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आलियानेही सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत आपली व्यथा मांडली. वकिलांच्या म्हणण्यानुसार, आलियाला घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न केले. एवढंच नाही तर पोलिसांनी त्यांना धमक्याही दिल्या. अजूनही त्यांच्यावरचे अत्याचार थांबत नाहीत.

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकीचे वकील रिजवान म्हणाले, ‘नवाजुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांनी गेल्या सात दिवसांपासून आलियाला जेवण दिलेले नाही. झोपण्यासाठी पलंग आणि आंघोळीसाठी बाथरुमही दिलेले नाही. खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून २४ तास अंगरक्षक तैनात आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबियांनी आलियाला घराबाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यांच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी अटक करण्याची धमकी दिली. आलियाला तिच्या दोन अल्पवयीन मुलांसह हॉलमध्ये राहण्यास भाग पाडले.


आलियाने शेअर केला व्हिडिओ

आलियाने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिची मुलं सोफ्यावर झोपताना दिसत आहेत. तिघेही हॉलमध्ये आहेत, तिथे एक महिलाही बसलेली दिसली. हा व्हिडिओ शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गेल्या सात दिवसांपासून मला माझ्याच नवऱ्याच्या घरात राहायला, झोपायला आणि हॉलचा वापर करायला भाग पाडले जात आहे. नुकतीच दुबईहून परतलेली माझी मुलं दोन सोफा सेट एकत्र करून हॉलमध्ये माझ्यासोबत झोपत आहेत.’

आलियाचे सासरच्यांवर गंभीर आरोप

आलियाने पुढे लिहिले की, ‘मी पाहुण्यांसाठी बनवलेल्या छोट्या बाथरूममध्ये आंघोळ करत आहे. जेवण नाही, झोप नाही आणि वर माझ्या आजूबाजूला सुरक्षा रक्षक आहेत. आता कॅमेरेही बसवण्यात आले असून माझ्या प्रत्येक कामावर लक्ष ठेवले जात आहे. शांतता नाही आणि गोपनीयता तर त्याहून नाही. सातही बेडरूम माझ्या सासरच्या लोकांनी बंद केल्या आहेत आणि माझा पती नवाजुद्दीन सिद्दीकी मला संरक्षण देण्यासाठी किंवा माझ्यासाठी उभा राहण्यासाठी देखील सापडला नाही.


आलियाला न्यायाची प्रतीक्षा

नवाजुद्दीनच्या पत्नीने पुढे सांगितले की, न्यायालयीन कागदपत्रांवर तिच्या वकिलांना तिची स्वाक्षरी घेण्याचीही परवानगी दिली जात नाही. सासरच्यांकडून होणारा छळ कधी संपेल का असा प्रश्नही तिने यावेळी उपस्थित केला. आलियाने शेवटी लिहिले की ती न्यायाची वाट पाहत आहे.

चंद्रावर उडी मारण्याचा विचार कराल तेव्हा.. आजच वापरायला लागा शाहरुखचा सक्सेस मंत्रा

२०२० मध्ये आलियाने घटस्फोटाचा खुलासा केला

नवाजुद्दीनने आलिया उर्फ अंजना किशोर पांडेशी लग्न केले. त्यांना शोरा आणि यानी ही दोन मुलं आहेत. १९ मे २०२० रोजी आलियाने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला होता की ती नवाजुद्दीनपासून घटस्फोट घेत आहे. त्यानंतर दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचे प्रथमच सर्वांना समजले. मात्र, त्यानंतर दोघांनी एकमेकांवर अनेकदा गंभीर आरोप केले.

लोक म्हणाले, माझे सिनेमे चालणार नाहीत, आता ‘पठाण’मुळे मागची ४ वर्ष विसरलो | शाहरुख खान



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.