Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
तो जिवंत असेल ही आशाच नव्हती; अडीच वर्षांनंतर मुलगा सापडला, वडिलांनी कडकडून मिठी मारली, फुटला अश्रूंचा बांध
‘हमने उसके जिंदा होने की उम्मीद ही छोड़ दी थी’ असे म्हणत ते गहिवरले. आपल्या ३० वर्षे वयाच्या मुलास मानसिक आजारातून पूर्णपणे बरे झाल्याचे पाहून त्याच्या पित्याच्या भावना अनावर झाल्या. घरातून अचानक बेपत्ता झालेल्या आपल्या मुलास अडीच वर्षांनंतर सुखरूप पाहून त्या पित्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आपल्या लेकाला समोर बघताच क्षणी त्याला त्यांनी कडकडून मिठी मारली. या तरुणाची अखेर उत्तर प्रदेश येथील आपल्या कुटुंबात परतला आहे.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! रागाच्या भरात त्याने कंडोम गळून टाकलं, त्यात होतं केळं, २४ तासांत घडलं भयंकर… डॉक्टरही उडाले
उत्तर प्रदेश येथील गाझीपूर भागातील एक ३० वर्षांचा मानसिक आजाराने ग्रस्त असलेला हा तरुण भटकत अडीच वर्षांपूर्वी मुंबईत आला. त्यानंतर तो माणगाव पोलिसांना भरकटलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रिया करून त्याला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल केले. सुरुवातीला तो काहीच बोलत नव्हता. मनोरुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू झाले. त्यावेळी त्याने फक्त दोन शब्द उच्चारले ‘दिलदार नगर, धनाडी’ यावरून त्यांनी अधिक माहिती मिळवत उत्तर प्रदेशातील गाझियाबाद पोलिसां जवळ संपर्क साधला. नंतर समाजसेवा अधीक्षक स्वाती कुलकर्णी यांनी त्याच्या घराचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच्याशी वारंवार संवाद साधून त्याकडून आणखी माहिती घेण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेश गाझीपूरमधील पोलिसांसोबत संपर्क केल्यावर त्यांनी त्याच्या घरचा पत्ता शोधला आणि अखेर त्याच्या कुटुंबाशी संपर्क झाला.
क्लिक करा आणि वाचा- मंगळ ग्रहावर कोणी बनवला अस्वलाचा चेहरा?; विचित्र आकृती पाहून शास्त्रज्ञांचीही उडाली झोप, पाहा काय आहे सत्य
कुलकर्णी यांनी व्हिडीओ कॉलद्वारे त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधताच, आईवडील निःशब्द झाले आणि त्यांना रडू कोसळले. “बहुत जगह इसको ढुंढा, मिल ही नही रहा था, हमने जिने की उम्मीद छोड़ दी थी, हमारे जिते जी हमारा लड़का हमे मिलेगा ये हमने सपने में भी नही सोचा था”, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी उत्तर प्रदेशवरून मुंबईला येण्यासाठी ट्रेन गाठली. आपल्या मुलाला पाहताच क्षणी कडकडून मिठी मारली. यावेळी उपस्थित नाही गहिवरून आले. मनोरुग्णालयाकडून आवश्यक कागदपत्रे आणि कपडे मागविले जातात. परंतु त्याच्या वडिलांनी कपडे आणले नव्हते. मुलाला घरी जाण्यासाठी कपडे नसल्याने पित्याने अंगावरचे कपडे त्याला देऊ केले. दारिद्र्य रेषेखालील हे कुटुंब आणि दुर्लक्षित भागात राहत असल्याने त्यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार देखील केली नव्हती. ते फक्त आपल्या मुलाला शोधतच होते, असे कुलकर्णी यांनी सांगितले. सोमवारी मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली या तरुणाची घरवापसी झाली.
क्लिक करा आणि वाचा- ते ठरले अखेरचे देवदर्शन, रामेश्वरमहून परतताना भीषण अपघात; भोकरदन, बीडच्या भाविकांचा मृत्यू
राजेंद्र पाटील हे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून अशा भरकटत आलेल्या मनोरुग्णांना सुखरूपरित्या ताब्यात घेऊन त्यांना मनोरुग्णालयात दाखल करतात. राजेंद्र पाटील यांच्या याच सतर्कतेमुळे एका हरवलेल्या तीस वर्षीय युवकाला आपल हजारो मैल दूर असलेलं कुटुंब पुन्हा मिळाले आहे. पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.