Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Photos- अखेर ‘मंडळी’ फुटली, निम्रित कौरच्या बाहेर जाण्याने तुटला शिव ठाकरे

10

मुंबई- बिग बॉस सीझन १६ मध्ये दररोज काही ना काही धक्कादायक गोष्टी घडत आहेत. कालच्या भागात पुन्हा एकदा मोठा ट्वीस्ट पाहायला मिळाला. काल अचानक निम्रित कौर अहलुवालिया बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. जनतेने दिलेल्या मतांच्या निष्कर्षावरून तिला घराबाहेर पडावे लागले. निम्रित १८ आठवडे बिग बॉसच्या घरात राहण्यात यशस्वी झाली होती.

ती बिग बॉस १६ ची पहिली आणि शेवटची कॅप्टन होती. तसेच, गेल्या आठवड्यात अंतिम फेरीचे तिकीट जिंकण्यातही ती यशस्वी ठरलेली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात सर्व सामान्यांची एण्ट्री झाली होती. त्यांच्या मतातून टास्कमधून टॉप ५ स्पर्धक महाअंतिम सोहळ्यासाठी निवडले जातील अशी बिग बॉसने घोषणा केली. यासाठी बिग बॉसने टास्कचे नियमही सर्वांना सांगितले. जनतेसमोर प्रत्येकाला मत मागावे लागेल आणि यासाठी स्पर्धकांना निवडणूक चिन्हही देण्यात आले. कार्यात प्रत्येकाने आपापले मुद्दे जनतेला सांगत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले.

यानंतर बिग बॉसने घरातील सर्व स्पर्धकांना बोलावून आपला निर्णय दिला व निम्रित कौरचा प्रवास संपत असल्याचं जाहीर केलं. निम्रितच्या अशा अचानक घराबाहेर जाण्यामुळे उर्वरीत मंडळीतील सदस्य शिव ठाकरे व एमसी स्टॅनला जबरदस्त धक्का बसला. शिव आणि निम्रितची मैत्री तर सर्वांनाच ठाऊक होती. निम्रित गेल्यामुळे मंडळीतील आणखी एक सदस्य कमी झाला.

निम्रितला ‘बिग बॉस १६’मध्ये मिळाली सिनेमाची ऑफर

दरम्यान, शोमध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक यांच्यासोबतचे तिचं नातं अनेकांना आवडलं होतं. इतकेच नाही तर ‘बिग बॉस’च्या घरात एकता कपूरने तिच्या आगामी ‘लव सेक्स और धोखा २’ सिनेमासाठी निम्रितला साइन केले. आता रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत कोण विजेता होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. त्यात निम्रितला शिव ठाकरे किंवा एमसी स्टॅनपैकी एकाने जिंकावे असंच वाटतं. आता देशातील लोकांनाही तेच वाटतं का ते लवकरच कळेल.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.