Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Valentine’s Day : पार्टनरला गिफ्ट करा हे ५ स्वस्त गॅझेट्स, किंमत सांगणे टाळा

7

नवी दिल्लीः Valentine Day अवघ्या चार पाच दिवसावर आला आहे. या दिवशी तुमच्या पार्टनरला सरप्राइजिंग गिफ्ट करायचे असेल तर आम्ही तुम्हाला खास माहिती देत आहोत. आपल्या पार्टनरला एक स्पेशल गॅझेट गिफ्ट करून त्याला सुखद धक्का द्या. आज आम्ही तुम्हाला अशाच खास गिफ्ट संबंधी माहिती देत आहोत. जाणून घ्या डिटेल्स.

स्मार्टफोन
स्मार्टफोन गिफ्ट करणे हे एक खास ठरू शकते. फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवर सध्या डिस्काउंट सुद्धा मिळत आहे. तुम्ही जुना फोन एक्सचेंज सुद्धा करू शकता. सॅमसंग, ओप्पो किंवा आयफोन सुद्धा तुम्ही तुमच्या पार्टनरला गिफ्ट करू शकता.

वाचाः Twitter Server Down : ट्विटरचे सर्व्हर डाउन, फेसबुक-इंस्टा-यूट्यूबवर लॉगिन करण्यात येतेय ही समस्या

स्मार्टवॉच
स्मार्टवॉच सारखे वियरेबल डिव्हाइस सुद्धा गिफ्ट करू शकता. स्मार्टवॉचला खरेदी करणे स्वस्तात मस्त ठरू शकते. या स्मार्टवॉच मध्ये हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स मिळतात. तुम्ही ऑनलाइन Noise, Fire-bolt Ninja, boAt आणि Fossil पैकी एक तुमच्या बजेटनुसार ऑनलाइन खरेदी करू शकता.

स्मार्ट स्पीकर
जर तुमच्या पार्टनरला ड्राइव्ह किंवा पिकनीकवेळी म्यूझिक ऐकण्याची आवड असेल तर तुम्ही त्याला स्मार्ट स्पीकर गिफ्ट करू शकता. मार्केटमध्ये ऑनलाइन BOSE, JBL, Blaupunkt आणि Sony कंपनीचे स्मार्ट स्पीकर उपलब्ध आहेत.

वाचाः OnePlus 11 ला टक्कर देण्यासाठी २६ फेब्रुवारीला येतोय Xiaomi 13 Pro

हेडफोन किंवा TWS ईयरबड
हेडफोन किंवा TWS ईयरबड सुद्धा एक तुमच्यासाठी चांगले ऑप्शन आहे. तुम्ही प्रीमियम रेंज मध्ये Apple AirPods थर्ड जेन पासून ते स्वस्त सेगमेंट मध्ये boAt, Noise, आणि Truke चे हेडफोन पर्यंत खरेदी करू शकता.

वाचाः HP i3 Laptop वर आला सर्वात मोठा डिस्काउंट, थेट २२ हजारांची मिळतेय सूट

फिटनेस ट्रॅकर
जर तुम्ही आपल्या पार्टनरच्या आरोग्याची काळजी घेत असाल तर त्याला एक फिटनेस ट्रॅकर गिफ्ट करू शकता. हे व्हेलेंटाइन डेवर खास गिफ्ट ठरू शकते.

वाचाः Twitter Blue : भारतात ट्विटरची पेड सब्सक्रिप्शन सर्विस लाँच, ब्लू टिकसाठी मोजावे लागणार ९०० रुपये

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.