Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

चार महिन्यांपूर्वी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधलं, पण वडिलांमुळे नाईलाज, ‘तो’ शिवसैनिक पुन्हा भाजपमध्ये परतणार

7

Authored by नागिंद मोरे | Edited by रोहित धामणस्कर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Feb 2023, 11:01 am

Dhule Politics Kadambande family | धुळ्याच्या राजकारणात कदमबांडे कुटुंबाला मोठी प्रतिष्ठा आहे. यशवर्धन कदमबांडे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर धुळे जिल्हा शिवसेनेला राजकारणातील मातब्बर चेहरा मिळाला होता.

 

Rajvardhan Kadambande Dhule
राजवर्धन कदमबांडे

हायलाइट्स:

  • यशवर्धन कदमबांडे यांच्यावर युवा सेनेत मोठी जबाबदारी
  • वैयक्तिक कौटुंबिक कारणामुळे भाजपमध्ये परतले
धुळे: शहराचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे चिरंजीव तथा युवा सेनेचे सहसचिव ठाकरे गट यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. कौटुंबिक कारणामुळे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे यशवर्धन कदमबांडे यांनी सांगितले. यशवर्धन कदम बांडे यांनी २० ऑक्टोबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सदस्य पदाचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर युवा सेनेत मोठी जबाबदारी ही यशवर्धन कदमबांडे यांच्यावर देण्यात आली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी युवासेनेचे सहसचिव पद देऊन पक्ष विस्ताराची धुरात त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी मात्र आपण भारतीय जनता पक्षातच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर यशवर्धन कदमबांडे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर धुळे जिल्हा शिवसेनेला राजकारणातील मातब्बर चेहरा मिळाला आणि त्यांनी आपल्या शिवसेनेतील प्रवासाला धडाकेबाज सुरुवात केली आणि धुळे शहरातील भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला होता. मात्र, त्यांच्या या चार महिन्यांच्या प्रवासानंतर आपले वडील माजी आमदार राजवर्धन कदमबांडे हे भारतीय जनता पक्षात असल्यामुळे मी पुन्हा भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे यशवर्धन कदमबांडे सांगितले.
भाजपला धक्का देत माजी आमदाराचा मुलगा थेट ‘मातोश्री’वर; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन
शिवसेनेच्या धुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी चांगले सहकार्य केले त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार नसून आपण वैयक्तिक कौटुंबिक कारणामुळे भारतीय जनता पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच मी युवासेना सहसचिव पदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली. यशवर्धन कदमबांडे हे आज मुंबईमध्ये मंत्री गिरीश महाजन आणि विधान परिषदेचे आमदार अमरीश भाई पटेल यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्ष यशवर्धन कदमबांडे यांना कुठली मोठी जबाबदारी हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

कदमबांडे भाजपसाठी इतके महत्त्वाचे का?

यशवर्धन यांचे वडील राजवर्धन कदमबांडे हे भाजपचे माजी आमदार आहेत. ते धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत. राजवर्धन कदमबांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून राजकीय क्षेत्रात पदार्पण केले होते. २०१९ मध्ये राजवर्धन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. छत्रपती शाहू महाराजांचे घराणे म्हणून कदमबांडे परिवाराला धुळ्याच्या राजकारणात मोठा मान आहे. राजवर्धन कदमबांडे यांनी गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक कार्याच्या माध्यमातून आपला जनसंपर्क वाढवत नेला. तरुण कार्यकर्त्यांमध्ये राजवर्धन कदमबांडे हे विशेष लोकप्रिय आहेत. धुळे परिसरात त्यांचा जनसंपर्क चांगला असल्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षासाठी राजवर्धन कदमबांडे हवेहवेसे आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.