Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष १८ फेब्रुवारी २०२३: महाशिवरात्री, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

6

Authored by Priyanka Wani | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 18 Feb 2023, 4:11 am

Daily Panchang: शनिवार १८ फेब्रुवारी २०२३, भारतीय सौर २९ माघ शके १९४४, माघ कृष्ण त्रयोदशी रात्री ८-०३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: उत्तराषाढा सायं. ५-४२ पर्यंत, चंद्रराशी: मकर, सूर्यनक्षत्र: धनिष्ठा,

 

राष्ट्रीय मिती माघ २९, शक संवत १९४४, माघ कृष्ण, त्रयोदशी, शनिवार, विक्रम संवत २०७९, सौर माघ मास प्रविष्टे ६, रज्जब-२६, हिजरी १४४४(मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख १८ फेब्रुवारी २०२३, सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतु.

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. त्रयोदशी तिथी रात्री ८ वाजून ३ मिनिटे त्यानंतर चतुर्दशी तिथी प्रारंभ. उत्तराषाढ नक्षत्र सायं ५ वाजून ४२ मिनिटे त्यानंतर श्रवण नक्षत्र प्रारंभ.

व्यतीपात योग सायं ७ वाजून ३६ मिनिटे त्यानंतर वरीयान योग प्रारंभ. गर करण सकाळी ९ वाजून ५० मिनिटे त्यानंतर शकुनि करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र मकर राशीत संचार करेल.

सूर्योदय:

सकाळी ७-०७,

सूर्यास्त:

सायं. ६-३९,

चंद्रोदय:

पहाटे ५-२५,

चंद्रास्त:

दुपारी ४-३८,

पूर्ण भरती:

सकाळी १०-०९ पाण्याची उंची ३.६३ मीटर, रात्री ११-१७ पाण्याची उंची ४.५५ मीटर,

पूर्ण ओहोटी:

पहाटे ४-३० पाण्याची उंची २.०१ मीटर, सायं. ४-२२ पाण्याची उंची ०,५१ मीटर.

दिनविशेष:

महाशिवरात्री, शनिप्रदोष, संत गाडगेबाबा जयंती ( तिथीप्रमाणे )
(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :

अभिजीत मुहूर्त दुपारी १२ वाजून १३ मिनिटे ते १२ वाजून ५८ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १३ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्‍यरात्री १२ वाजून ९ मिनिटे ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ११ मिनिटे ते ६ वाजून ३६ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून २४ मिनिटे ते ४ वाजून ४९ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :

राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ६ वाजून ५७ मिनिटे ते ७ वाजून ४२ मिनिटापर्यंत राहील. यानंतर सकाळी ७ वाजून ४२ मिनिटे ते ८ वाजून २७ मिनिटापर्यंत.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.