Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिओने आणला नवीन प्लान, १५२ रुपयात संपूर्ण महिना अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

8

नवी दिल्लीः जिओने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन प्लान आणला आहे. आता कंपनीचा एक प्लान खूप दिवसांपासून चर्चेत होता. जर तुम्हाला हा प्लान हवा असेल तर याच्या फायद्यांसंबंधी सविस्तर जाणून घ्या. जिओच्या १५२ रुपयाच्या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाची सुविधा मिळू शकते. तसेच काही अन्य फायदेही या प्लानमध्ये मिळतात. जाणून घ्या या प्लान संबंधी.

Jio 152 Recharge ची वैधता २८ दिवसाची आहे. यात एकूण १४ जीबी डेटा दिला जातो. रोज ०.५ जीबी डेटा दिला जातो. सोबत या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. यात कारणामुळे या प्लानची सर्वात जास्त चर्चा आहे. या प्लानमध्ये डेटा व कॉलिंग शिवाय, रोज ३०० एसएमएस दिले जातात. हा प्लान खूप फायदेशीर आहे. परंतु, हा प्लान फक्त जिओ फोन यूजर्ससाठी आहे.

वाचाः उन्हाळा येतोय, त्याआधीच ४७४ रुपयात खरेदी कारा Portable Mini Cooler, पाहा डिटेल्स

Subscriptions साठी यात कोणतीही अडचण नाही. या प्लानमध्ये Jio TV, Jio Cinema, Jio Security चे सब्सक्रिप्शन मिळते. परंतु, हे सर्व फायदे तुम्ही फक्त जिओ फोन मध्ये घेवू शकतात. जर तुम्ही जिओ फोन यूजर्स असाल तर तुम्ही या प्लानला तुमच्या लिस्ट मध्ये सहभागी करू शकता.

वाचाः Vivo Y56 5G स्मार्टफोन भारतात गुपचूप लाँच, पाहा किंमत-फीचर्स

Jio 91 Recharge
Jio 91 Recharge अशा यूजर्ससाठी बेस्ट आहे. ज्यांना कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स हवे असतात. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाते. सोबत या प्लानमध्ये ५० एसएमएस दिले जाते. हा प्लान रोज १०० एमबी हाय स्पीड डेटा ऑफर करतो. याला तुम्ही सहज ऑफर करू शकता. कमी किंमतीत जबरदस्त प्लान सर्च करीत असाल तर हा प्लान तुमच्याासाठी चांगला आहे. कारण कमी किंमतीत इतके बेनिफिट् अन्य नेटवर्कवर मिळत नाही.

वाचाः OPPO Reno 9 नव्हे तर थेट Reno 10 series होणार भारतात लाँच, पाहा डिटेल्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.