Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

४ एप्रिलला येतोय वनप्लसचा खास स्मार्टफोन, सोबत OnePlus Nord Buds 2 येणार

6

नवी दिल्लीःOnePlus Nord CE 3 Lite 5G फोन येत्या ४ एप्रिल रोजी लाँच केला जाणार आहे. आज कंपनीने अधिकृतपणे या फोनच्या लाँचिंगवरून पडदा हटवला आहे. सोबत याचाही खुलासा केला की, याच दिवशी OnePlus चे नवीन टीडब्लूएस Nord Buds 2 ला लाँच करण्यात येणार आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन्स संबंधी कंपनीने अद्याप कोणतेही माहिती दिली नाही. परंतु, लीक्सवरून काही माहिती समोर आली आहे.

वनप्लसचा लाँचिंग इव्हेंट
वनप्लस इंडियाकडून सांगितले गेले की, कंपनी आगामी ४ एप्रिल रोजी भारतात नवीन इव्हेंटचे आयोजन करीत आहे. ज्याला ‘Larger than life – A OnePlus Nord Launch Event’ असे नाव दिले आहे. हा इव्हेंट सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. या मंचावरून OnePlus Nord CE 3 Lite 5G आणि OnePlus Nord Buds 2 भारतात लाँच करण्यात येणार आहे. या लाँचिंगला कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह पाहता येवू शकणार आहे.

वाचाः मस्तच! आता डेस्कटॉपवरून करा WhatsApp व्हिडिओ आणि ऑडियो कॉल, पाहा डिटेल्स

OnePlus Nord CE 3 Lite 5G संबंधी काही लीक्स समोर आले आहेत. या माहितीनुसार, स्मार्टफोनमध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला जावू शकतो. हा स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनेल वर बनवली जावू शकते. ज्यात १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट दिला जावू शकतो. हा स्क्रीन पंच होल स्टाइलचा असू शकतो. या फोनमध्ये अँड्रॉयड १३ दिले जावू शकते. यासोबत ऑक्सिजन ओएस १३ आणले जावू शकते. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ चिपसेट पाहायला मिळू शकते. लीक्सनुसार, या फोनला ८ जीबी रॅम आणि १२ जीबी रॅम मेमरी सोबत १२८ जीबी स्टोरेज आणि २५६ जीबी स्टोरेज मध्ये मार्केटमध्ये आणले जावू शकते. फोटोग्राफी साठी OnePlus Nord CE 3 Lite 5G मध्ये १०८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जावू शकतो. जो मायक्रो लेन्स आणि डेप्थ सेन्सर सोबत मिळून काम करेल. याचप्रमाणे सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा पाहायला मिळू शकतो.

वाचाः अदानी वीज कार्यालयातून बोलतोय, असं सांगून महिलेच्या खात्यातून ६.९ लाख लंपास

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.