Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Apple iPhone 13 च्या 128GB मॉडेलची मूळ किंमत ६९,९९९ रुपये आहे. ज्यावर ११ टक्के डिस्काउंटनंतर फ्लिपकार्टवर ६१,९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. तसंच फोनच्या खरेदीवर २९,२५० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यासोबतच निवडक मॉडेल्सवर ३००० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्यामुळे तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेतल्यास, iPhone 13 ची किंमत सुमारे २९,७४९ इतकी कमी तुम्हाला पडेल. याशिवाय HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डने iPhone 13 खरेदी करताना, तुम्ही २००० रुपयांच्या अतिरिक्त सवलतीचा आनंद देखील घेऊ शकाल. अशा प्रकारे iphone 13 ची किंमत तुम्हाला केवळ २७ हजार रुपये इतकी पडेल. पण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेताना एक गोष्ट मात्र लक्षात घेणं गरजेचं आहे, ते म्हणजे तुम्ही देत असलेला जुना फोन जितक्या चांगल्या स्थितीत असेल तितकीच चांगली किंमत तुम्हाला मिळेल. तसंच फोनच्या मॉडेलवरही किंमत अवलंबून असणार आहे.
वाचा :iPhone 14 ऑनलाईन स्वस्त मिळेल का ॲपल स्टोरमध्ये? वाचा सविस्तर
Apple iPhone 13 चे खास फीचर्स
Apple iPhone 13 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोनमध्ये 12MP चा डुअल कॅमेरा सेटअप आहे. तर फ्रंटला 12MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोन A15 बायोनिक चिपसेट सपोर्टसह येतो.
वाचाःChatGPT की मानवी मेंदू, कोण जास्त तल्लख? इन्फोसिसच्या नारायण मूर्ती यांचं मोठं विधान