Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘आधार’ प्रमाणीकरणाची प्रक्रिया स्टुडंट पोर्टलवर, शाळांतील गोंधळ सुरूच

7

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक जिल्ह्यातील १ ली ते १२ वी पर्यंतच्या पटावरील विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची प्रमाणीकरणाची प्रक्रिया स्टुडंट पोर्टलवर सुरू आहे. मात्र, जिल्ह्यातील १३ लाख १२ हजार ८३७ विद्यार्थ्यांपैकी आधार उपलब्ध असलेल्या १२ लाख ९९ हजार ७२४ विद्यार्थ्यांपैकी अजूनही १ लाख ९८ हजार ४२ विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक जुळत नसल्याने शाळांतील गोंधळ सुरूच आहे.

विशेष म्हणजे, आधार प्रमाणिकरणाच्या कामासाठीची अंतिम मुदतदेखील जवळ येवून ठेपली आहे. आधार क्रमांक न जुळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखोच्या घरात असल्याने बोगस पटनोंदणीला वाचा फुटण्याची शक्यता वाढली आहे.

…यामुळे रखडतेय कार्य

– विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित कामात राज्यातील पहिल्या ५० तालुक्यांत (ब्लॉक) मालेगाव मनपा २१, मालेगाव तालुका ४५, नाशिक यूआरसी दोन ४८, तर नाशिक यूआरसी एक ४९ व्या क्रमांकावर आहे.

– राज्यातील पहिल्या शंभर ब्लॉकमध्ये जिल्ह्यातील बागलाण तालुक्याचादेखील नंबर लागतो. जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव शहरांसह बागलाण तालुक्यातच सर्वात जास्त आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे.

– आधार वैध नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाणदेखील जास्त असून, विद्यार्थी आधार उपलब्धता आणि वैध आधारमध्ये याच तालुक्यांत जास्त गोंधळ सुरू आहे.

– बहुतेक शिक्षण संस्था या राजकीय नेते, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या आहेत. जिल्ह्यात २ लाख ९८ हजार २०२ विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे.

नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी प्रगती

तालुका–एकूण विद्यार्थी संख्या–आधार उपलब्ध विद्यार्थी–वैध आधार–वैध नसलेले–आधार क्रमांक नसलेले–आधार प्रमाणीकरण प्रलंबित

मालेगाव मनपा—१,३८,४४१—१,३४,६५७—९१,१५४—२४,४५५—३,७८४—४७,२८७

मालेगाव—९१,७६९—९०,६८८—६०,७०५—१८,६९०—१,०८१—३१,०६४

नाशिक २—१,४१,९५४—१,४०,४६८—१,११,७५५—१९,६०२—१,४८६—३०,१९९

नाशिक १—१,६०,४६८—१,५९,२२०—१,३०,३२५—१९,३०६—१,२४८—३०,१४३

बागलाण—८१,५२२—८१,१०६—६२,६६०—१४,२१५—४१६—१८,८४५

निफाड—९९,५४९—९९,१९२—८२,३१५—१२,०९८—३५७—१७,२३४

येवला—५८,३२६—५७,७३७—४४,१७८—१०,१७१—५८९—१४,१४८

नाशिक—५९,६५०—५९,१३४—४६,८५३—९,३४४—५१६—१२,७९७

सिन्नर—७०,५८३—६९,८८०—५८,२६७—८,३९७—७०३—१२,३१६

नांदगाव—६०२२२—५९७३८—४८०४०—८,२१६—४८४—१२,१८२

दिंडोरी—७१,२०९—७०,८५३—५९,८७५—८,७७८—३५६—११,३३४

त्र्यंबक—३९,४९६—३९,१२४—२८,५४९—८,५९८—३७२—११,०३७

सुरगाणा—३८,७१६—३८,३३२—२७,९०२—६,८४१—३८४—१०,८१४

कळवण—४३,४३३—४२,९५८—३४,७३७—६,१४२—४७५—८,७०१

इगतपुरी—५१,७७७—५१,४७९—४३,१२०—६,८७८—२९८—८,६५७

देवळा—३२,११५—३१,७७६—२३,६५२—५,५६९—३३९—८,४६३

चांदवड—४५,९८४—४५,८८०—३८,४२७—६,०६३—१०४—७,५५७

पेठ—२७,६२३—२७,५०२—२२,१९९—४,६७९—१२१—५,४२४

एकूण—१३,१२,८३७—१२,९९,७२४—१०,१४,६१८—१,९८,०४२—१३,११३—२,९८,२०२

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.