Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पावसाची शक्यता दिसताच तुमच्या DTH कनेक्शनवर नो सिग्नल दिसतेय?, सोल्यूशनसाठी या ट्रिक्स बेस्ट

9

DTH Solutions : डीटीएच किंवा डायरेक्ट टू होम सेवा म्हणजे थोडक्यात काय तर टीव्हीवर विविध टेलिव्हिजन चॅनेल्ससचं थेट प्रेक्षपण पाहण्यासाठी घरावर डिश लावली जाते. घरावर, बिल्डिंगच्या टेरेसवर किंवा कोणत्याही उंच ठिकाणी ही डिश लावली जाते. दरम्यान आधीच्या काळात अँटिनावर फारच कमी सिग्नल पकडत आणि चॅनेल्सही कमी दिसत पण आता डिशमुळे विस्तृत टीव्ही चॅनलचं थेट प्रसारण घरबसल्या पाहता येत आहे. पण या डिशना देखील कधी-कधी तांत्रिक बिघाड येतो. खासकरुन पावसाळ्याच्या दिवसात वातावरण बदलल्यामुळे नो सिग्नलच्या समस्या अनेकदा येतात. चांगला कार्यक्रम किंवा सिनेमा सुरु असताना हा नो सिग्नलता मेसेज किती त्रासदायक असतो, हे आपल्यापैकी अनेकांनी अनुभवलंही असेल. पण हात इश्यू तुम्ही कसा दुरुस्त करू शकता आणि तुमच्या कार्यक्रम किंवा सिनेमाचा आंद परत कसा घेऊ शकता, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत…

KU बँड ट्रान्समिशन सेवा अधिक चांगली

रिपोर्ट्सनुसार अनेकदा खराब हवामान बहुतेक प्रकरणांमध्ये सिग्नल गमावण्याचे मुख्य कारण आहे. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा वादळ असते तेव्हा सिग्नल ट्रान्समिशनवर वाईट परिणाम होतो. यामुळेच आपल्या डिशचा सिग्नल जातो. त्यामुळे डिश बसवताना त्यात C बँड ट्रान्समिशन ऐवजी KU बँड ट्रान्समिशन सेवा असावी. त्यामुळे इन्स्टॉलेशन करतानाचा सर्व्हिस प्रोव्हायडरशी याबाबत बोलून घ्या आणि C बँड ट्रान्समिशनऐवजी KU बँड ट्रान्समिशनचं असेल याची खात्री करा

​वाचा : आता तुमचं प्रायव्हेट चॅट राहिल एकदम ‘प्रायव्हेट’, असं लॉक करा WhatsApp

​चांगल्या दर्जाचे ट्रान्सपॉन्डर बसवा

​चांगल्या दर्जाचे ट्रान्सपॉन्डर बसवा

तुमच्या घरात DTH इन्स्टॉल करताना आवर्जून घरी थांबा. कारण इन्स्टॉलेशनदरम्यान चांगल्या दर्जाच्या गोष्टी वापरल्या जात आहेत का याची खात्री करणं गरजेचं आहे. त्यामुळे चांगल्या-दर्जाचे ट्रान्सपॉन्डर इन्स्टॉल केल्याने खराब नेटवर्क मिळणार नाही. चुकीचे ट्रान्सपॉन्डर निवडल्यामुळे लवकरच नो सिग्नल आणि इतर प्रॉब्लेम्स येऊ लागतील.

​वाचा : Gaming Laptops : आता गेम खेळणं होईल अगदी खरंखुरं! ‘हे’ टॉप ५ गेमिंग लॅपटॉप आहेत बेस्ट

सिग्नल स्ट्रेंथ चेक करा

सिग्नल स्ट्रेंथ चेक करा

इन्स्टॉलेशन दरम्यान सिग्नल स्ट्रेंथ तपासण्याचे नक्की लक्षात ठेवा. नेमक्या सिग्नल स्ट्रेंथ संबधित तपशीलांसाठी तुम्ही तुमच्या सेट-टॉप बॉक्ससोबतचं पुस्तक पाहू शकता. यामध्ये तुम्हाला आधी मेनू सेटिंग – इंस्‍टॉलेशनवर जावे लागेल, त्याठिकाणी तुम्ही तुमची सिग्नल स्ट्रेंथ तपासू शकता आणि स्ट्रेंथमध्ये स्वतः सेटिंग करू शकता. जर हे इंस्टॉलेशन दरम्यान असेल, तर तुम्ही खात्री करू शकता की ट्रान्सपॉन्डरला जास्तीत जास्त सिग्नल मिळत आहेका, यासााठी इन्स्टॉलेशन करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचीही मदत घेऊ शकता.

​वाचा : Battery Saver : फोनची बॅटरी सारखी संपतेय? चार्जिंग वाचवण्यासाठी या ६ टिप्स करा फॉलो

सिग्नल स्टेटस मजबूत आहे का? चेक करा

सिग्नल स्टेटस मजबूत आहे का? चेक करा

सिग्नलचं स्टेटस मजबूत असल्याची नेहमी खात्री करा. तुमच्या डिश रिमोटवरून सेट-टॉप बॉक्स सेटिंग तपासा आणि INFO बटणावरून सिग्नल स्टेटस हा पर्याय शोधा. सिग्नल स्ट्रेंथ आणि सिग्नल क्वॉलिटी यांची टक्केवारी शोधा. सिग्नलची तीव्रता आणि सिग्नल क्वॉलीटी दोन्ही चेक करणंही फार महत्त्वाचं आहे.

​वाचा : कुठंही जायची गरज नाही, घरात बसून ठीक करू शकता आयफोनची बॅटरी, पाहा टिप्स

चांगले सिग्नल मिळविण्यासाठी सोप्या टीप्स

चांगले सिग्नल मिळविण्यासाठी सोप्या टीप्स
  • कनेक्शन केबल्समध्ये एकही जॉईंट नसेल याची खात्री करा
  • तुमच्या DTH कनेक्शनसाठी नेहमी उच्च दर्जाच्या केबल्स वापरा
  • चांगल्या एक्सपिरियन्ससाठी नॉईस ब्लॉकिंग करता चांगल्या दर्जाच्या LNB उपकरणांचा वापर करा.
  • कनेक्टिव्हिटी समस्या कायम तपासून सर्व्हिस प्रोव्हाडरशी संपर्कात राहा.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.