Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nothing Phone (1) फोनची किंमत १० हजारांनी कमी, खरेदीसाठी उडाली झुंबड

7

नवी दिल्लीः Nothing Phone (1) फोन त्याच्या डिझाइनमुळे खूपच चर्चेत होता. सोबत या फोनमध्ये अनेक शानदार फीचर्स सुद्धा दिले आहेत. जर तुम्हाला हा फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी काही खास माहिती देत आहोत. तसेच या फोन वर सुरू असलेल्या डिस्काउंट ऑफर संबंधी माहिती देत आहोत. हा डिस्काउंट पाहिल्यानंतर तुम्ही आजच या फोनला ऑर्डर कराल, जाणून घ्या डिटेल्स.

Nothing Phone (1) (256GB+8GB RAM) ला तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. या स्मार्टफोनची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. यावर २५ टक्के डिस्काउंट नंतर हा फोन २९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा मिळत आहे. SBI Credit Card वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतो. ही ऑफर फक्त EMI Transaction वर मिळणार आहे.

वाचाः Flipkart Sale : फ्लिपकार्टचा बंपर सेल, दमदार फोन्सवर दमदार सूट, Realme, Google, Poco ब्रँड्सवर खास सवलत

या फोनवर १ वर्षाची वॉरंटी सुद्धा दिली जाते. आज ऑर्डर केल्यास हा स्मार्टफोन तुम्हाला उद्यापर्यंत मिळू शकेल. फोनला घरी डिलिव्हर केले जाईल. Nothing Phone (1) आपल्या ट्रान्सपॅरेंट डिझाइनमुळे खूपच चर्चेत होता. याच कारणामुळे याची विक्री सुद्धा चांगली झाली आहे. परंतु, काही दिवसांपासून या फोनच्या किंमतीत अचानक घसरण पाहायला मिळत आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशनवरून कोणतीही तक्रार नाही.

वाचाः Whatsapp खास नवं फीचर, एक Whatsapp अकाउंट चार फोनमध्ये वापरता येणार

Nothing Phone (1) मध्ये 6.55 Inch Full HD+ Display मिळणार आहे. याशिवाय, यात ड्युअल रिअर कॅमेरा सुद्धा दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सलचा आहे. फ्रंट कॅमेरा म्हणून या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा आहे. फोनमध्ये 4500 mAh Battery सुद्धा दिली आहे. याशिवाय, प्रोसेसर संबंधी तुम्हाला कोणतीही तक्रार राहत नाही. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 778G+ Processor मिळतो.

वाचाः WhatsApp मध्ये येतेय मोठे अपडेट, एकाच स्क्रीनवर अनेक लोकांसोबत करा बिनधास्त चॅटिंग

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.