Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ४ मे २०२३ : श्रीनृसिंह जयंती, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

10

राष्ट्रीय मिती वैशाख १४, शक संवत १९४५, वैशाख, शुक्ल चतुर्दशी, गुरुवार, विक्रम संवत् २०८०, सौर वैशाख मास प्रविष्टे २१, शव्वाल-१३, हिजरी १४४४ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ४ मे २०२३, सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. चतुर्दशी तिथी रात्री ११ वाजून ४५ मिनिटापर्यंत त्यानंतर पौर्णिमा तिथी प्रारंभ. चित्रा नक्षत्र रात्री ९ वाजून ३५ मिनिटापर्यंत स्वाती नक्षत्रात प्रारंभ. वज्र योग सकाळी १० वाजून ३६ मिनिटापर्यंत सिद्ध योग प्रारंभ. गर करण सकाळी ११ वाजून ४८ त्यानंतर विष्टि करण प्रारंभ. चंद्र सकाळी ९ वाजून १० मिनिटापर्यंत कन्या राशीत तूळ राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-११,
सूर्यास्त: सायं. ७-०१,
चंद्रोदय: सायं. ५-५३,
चंद्रास्त: पहाटे ५-०४,
पूर्ण भरती: सकाळी ११-१९ पाण्याची उंची ४.१३ मीटर, रात्री ११-१९ पाण्याची उंची ४.०७ मीटर,
पूर्ण ओहोटी: पहाटे ४-५१ पाण्याची उंची ०.७७ मीटर, सायं. ५-०९ पाण्याची उंची १.५६ मीटर.

दिनविशेष: श्रीनृसिंह जयंती.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ५१ मिनिटे ते १२ वाजून ४५ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटे ते ३ वाजून २५ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ मध्‍यरात्री ११ वाजून ५६ मिनिटापर्यंत ते १२ वाजून ३९ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ६ वाजून ५७ मिनिटापर्यंत ते ७ वाजून १८ मिनिटापर्यंत. अमृत काळ दुपारी ३ वाजून १ मिनिटापर्यंत ते ४ वाजून ३९ मिनिटापर्यंत राहील. रवी योग सकाळी ५ वाजून ३८ मिनिटे ते रात्री ९ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ५ मिनिटे ते १० वाजून ५८ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून २५ मिनिटे ते ४ वाजून १८ मिनिटापर्यंत राहील. भद्रा रात्री ११ वाजून ४४ मिनिटे ते सकाळी ५ वाजून ३८ मिनिटापर्यंत राहील.

आजचा उपाय : आज केळ्याच्या झाडाला दूध अर्पण करा आणि गायीला पिठाचे गोळ्यात चण्याची डाळ आणि गुड मिसळून खाऊ घाला.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.