Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

RTE Admission: सीबीएसई शाळांची लॉटरी, जाणून घ्या तपशील

9

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई

नवी मुंबई महापालिकेने शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, या हेतूने सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू केल्या आहेत. यंदा या शाळांमधील २४०जागांसाठी ९५९ अर्ज दाखल झाले आहेत. या शाळांची लॉटरी ४ मे रोजी काढण्यात येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेने कोपरखैरणे सेक्टर ११ व नेरूळ सेक्टर ५० येथे सीबीएसई मंडळाच्या शाळा उभारल्या आहेत. खासगी शाळांमध्ये भरमसाट फी घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हे शिक्षण आपल्या पाल्यांना देणे आवाक्याबाहेरचे असल्याने नवी मुंबई महापालिकेने गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सीबीएसई शाळा सुरू केली आहे. या शाळांना चांगला प्रतिसाद आहे.

यावर्षी प्रवेश घेण्यासाठी २५मार्चपर्यंत अर्ज मागविण्यात आले होते. दोन्ही शाळांमध्ये एकूण एक हजार ११५ अर्ज दाखल झाले आहेत. कोपरखैरणे येथील शाळा क्रमांक ९४ मध्ये ६७३ अर्ज दाखल झाले असून ५२१ पात्र ठरले आहेत तर, सीवूड्स शाळा क्रमांक ९३मध्ये ४४२ अर्ज प्राप्त झाले असून ४१४अर्ज पात्र ठरले आहेत. यापैकी २४० जागांसाठी लॉटरीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. यामध्ये वयोगटात न बसल्याने आणि शाळेजवळच्या परिघाचा विचार करता उर्वरित अर्ज बाद झाले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.