Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Amazon Summer Sale 2023: फक्त ७ हजारांपासून स्मार्ट टीव्ही घेण्याची संधी, सेलमधील ‘या’ आहेत ५ बेस्ट स्मार्ट टीव्ही डिल

24


Best Smart TV 32 Inches in Amazon Sell :
आजकाल इलेक्ट्रॉनिक गॅजेट घेणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलं आहे. आजकाल टेक्नोलॉजी देखील खूप अपग्रेड झाल्यामुळे नवनवीन गोष्टी मार्केटमध्ये येतच आहेत. आता टीव्हीचीच कन्सेप्ट घेतली तर आधीचे टीव्ही आणि आताचे टीव्ही फार फरक आहे. दरम्यान आजकाल सर्वांच्या घरी स्मार्ट टीव्ही आहेत, आता तुम्ही देखील स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे. कारण स्मार्ट टीव्हीच्या खरेदीवर भरघोस डिस्काउंट ऑफर सध्या दिली जात आहे. ही सवलत ऑफर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon द्वारे दिली जात आहे. अॅमेझॉनच्या ग्रेट समर सेलमध्येही सवलत असून हा सेल आता संपत आला आहे. ८ मे अखेऱची तारीख असल्याने ज्यांना खरेदी करायची असेल त्यांना त्वरीत करावी लागेल. दरम्यान अगदी ७ हजारांपासून स्मार्ट टीव्ही मिळत असून खरेदीवर बँक डिस्काउंट ऑफर ही दिली जात आहे. यासोबतच इतरही अनेक डिस्काउंट ऑफर्स देण्यात येत आहेत. ज्याच्या मदतीने स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करता येईल. चलातर काही खास ऑप्शन्स पाहू…

VW Smart TV

तर या यादीतील अगदी स्वस्त असा टीव्ही म्हणाल तर हा
VW कंपनीचा स्मार्ट टीव्ही. ३२ इंचाचा हा स्मार्ट टीव्ही एक कमी बजेट असणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन आहे. हा HD रेडी अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आहे. याचं रेटिंग 5 इतकं आहे. या टीव्हीची मूळ किंमत १६,९९९ रुपये असून Amazon डीलमध्ये टीव्ही 7,599 रुपयांना खरेदी करता येईल.

​वाचाः ‘या’ १० प्रकारचे पासवर्ड कधीच ठेऊ नका, अवघ्या काही सेकंदात हॅकर्स ओळखू शकतात तुमचा Password

Samsung Smart TV

samsung-smart-tv

सॅमसंग कंपनीचा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही Amazon समर सेल 2023 मध्ये अगदी स्वस्तात विक्रीसाठी उपलब्ध करून दिला आहे. याठिकाणी तुम्ही हा स्वस्तात मस्त स्मार्ट टीव्ही ११,९९० रुपयांंना खरेदी करु शकता. याची मूळ किंमत
२२,९०० रुपये इतकी आहे. हा HD Red LED स्मार्ट टीव्ही आहे. हा टीव्ही ग्लॉसी ब्लॅक फिनिशमध्ये येतो. या स्मार्ट टीव्हीवर सेलमध्ये ४८ टक्के इतकी सूट आहे.

​वाचाः मला नोकरी शोधून दे किंवा एखादा जोक सांग, ChatGPT म्हणजे ॲप्लिकेशन एक आणि फायदे अनेक

Redmi Smart TV

redmi-smart-tv

बजेट फोन बनवणारी कंपनी रेडमीचा टीव्ही देखील या यादीत आहे. Redmi 32 inch HD रेडी स्मार्ट टीव्ही या सेलमध्ये स्वस्तात विकत घेता येईल. या टीव्हीची मूळ किंमत २४,९९९ रुपये इतकी असून हा Amazon डिस्काउंट ऑफरमध्ये ५० टक्के डिस्काउंटनंतर केवळ १२,४९९ रुपयांना खरेदी करता येईल. ​ हा 5 स्टार रेटिंग टीव्ही आहे.

​वाचाः Samsung M53 5G स्मार्टफोनवर १० हजारांपर्यंतची सूट, तब्बल 108Mp चा आहे कॅमेरा

Acer Smart TV

acer-smart-tv

Acer चा 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही अॅमेझॉन समर सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. हा Acer चा I सीरीज स्मार्ट टीव्ही आहे, जो HD रेडी अँड्रॉइड स्मार्ट टीव्ही आहे. या टीव्हीची मूळ किंमत १९,९९० रुपये असून सेलमध्ये यावर ४५ टक्के डिस्काउंट दिलं गेलं आहे. ज्यानंतर हा टीव्ही १० हजार ९९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

​वाचाः हवामानात बदल होताच AC च्या किंमतीत घसरण, ६० हजाराचा Lloyd 1.5 टन स्पिलिट एसी २७ हजारात

OnePlus Smart TV

oneplus-smart-tv

वनप्लस कंपनीचा स्मार्ट टीव्ही देखील या यादीत आहे. कंपनीचा हा स्मार्ट टीव्ही ३२ इंच स्क्रीन असणारा आहे. हा Y सिरीजमधील HD रेडी एलईडी स्मार्ट टीव्ही आहे. जो एंड्रॉइड सपोर्ट सह येतो. याची मूळ किंमत १९,९९९ रुपये आहे. हा टीव्ही ४३ टक्के डिस्काउंटनंतर ११, ४९९ रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.

​वाचाः Smartphone Photography : फोन ‘स्वस्त’ पण फोटो येतील ‘मस्त’, फक्त ‘या’ सोप्या टीप्स करा फॉलो!

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.