Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जिओपेक्षाही स्वस्त आहे एअरटेलचा हा प्लान, कमी किंमतीत वर्षभर अनलिमिटेड कॉलिंग-डेटा

18

टेलिकॉम कंपनी एअरटेल आणि जिओ मध्ये यूजर्सला आकर्षित करण्यासाठी चढाओढ लागली आहे. दोन्ही कंपन्या नवीन नवीन रिचार्ज प्लान आणत आहे. या प्लानमध्ये एका महिन्यासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा सोबत एका वर्षापर्यंतची वैधतेच्या प्लानचा समावेश आहे. एअरटेलने नुकताच एक प्लान आणला आहे. ज्यात कमी किंमतीत एक वर्षासाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटाचा लाभ घेतला जाऊ शकतो. जाणून घ्या डिटेल्स. एअरटेलच्या या प्लानची किंमत १७९९ रुपये आहे. हा प्रीपेड रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये यूजर्सला संपूर्ण ३६५ दिवसाची वैधता मिळते. या प्लानमध्ये मोठ्या वैधते सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा मिळतो. जाणून घ्या डिटेल्स.

एअरटेलच्या १७९९ रुपयाच्या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा मिळतो. तुम्ही आपल्या मर्जीने याचा वापर करू शकता. तुमचा डेली डेटा संपण्याचं टेन्शन नाही. डेटा संपल्यानंतर यूजर्सला 50P/Mb चार्ज केला जाईल. परंतु, इंटरनेट डेटा संपल्यानंतर तुम्ही डेटा अॅड ऑन्स प्लानला आपल्या स्मार्टफोनमध्ये रिचार्ज करू शकता. एअरटेलच्या या प्लान सोबत १०० एसएमएस रोज मिळू शकतो. वर्षभरासाठी तुम्हाला ३६०० मेसेजची सुविधा मिळेल. या प्लानमध्ये अन्य सुविधा सुद्धा मिळू शकतात. यात अपोलो 24/7 सर्कल, विंक म्यूझिक अॅपचे फ्री सब्सक्रिप्शन आणि फ्री हॅलो ट्यूनची सुविधा मिळते. जर तुम्हाला कमी किंमतीत मोठ्या वैधतेचा प्लान हवा असेल तर तुमच्यासाठी हा प्लान एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

वाचाः ‘या’ आठवड्यात लाँच झाले हे स्मार्टफोन, पाहा फोनची संपूर्ण लिस्ट, किंमत आणि फीचर्स

जिओचा एका वर्षाचा वैधतेचा प्लान

एअरटेलच्या तुलनेत जिओचा सर्वात कमी किंमतीचा एक वर्षाचा प्लान आहे. या प्लानची किंमत २८७९ रुपये आहे. या प्लान सोबत ३६५ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस मिळते.

वाचाः iPhone 16 Pro, iPhone 16 Pro Max मध्ये मिळणार आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्प्ले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.