Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iPhone 13 फक्त २३ हजारांना विकत घेऊ शकता,’या’ साइटवर सुरु आहे ऑफर

9

नवी दिल्ली : Apple कंपनीचा iPhone 13 अगदी कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. iPhone 13 फक्त २३,९९९ रुपयांना Flipkart वर खरेदी करण्याची ऑफर दिली जात आहे. पण ही नेमकी ऑफर काय आहे ते आधी जाणून घेऊ. iPhone 13 च्या 128 GB मॉडेलवर ही ऑफर आहे. त्यामुळे तुम्हाला आयफोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी ही सर्वोत्तम संधी आहे.Apple iPhone 13 ची किंमत आणि नेमकी ऑफर
आयफोन १३ च्या 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६९,९०० रुपये आहे. पण ११ टक्के डिस्काउंटनंतर, फ्लिपकार्टवर किंमत ६१,९९९ रुपयांना विक्रीसाठी ऑफर करण्यात आली आहे. याशिवाय फोनच्या खरेदीवर ३३,००० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यासोबतच निवडक मॉडेल्सवर ३००० रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यानंतर फोनची किंमत केवळ २५,९९९ रुपये होते. तसंच HDFC क्रेडिट आणि डेबिट कार्डने फोन खरेदी केल्यास २००० रुपयांची सूट दिली जात आहे. जर तुम्ही संपूर्ण एक्सचेंज ऑफरचा लाभ घेत असाल, तर फोनची किंमत केवळ २३,९९९ रुपये इतकी होईल. तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही हा फोन २,५८४ रुपयांच्या मासिक EMI पर्यायामध्ये खरेदी करू शकता. फोनच्या खरेदीवर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. तसेच, 7 दिवस बदलण्याची ऑफर उपलब्ध आहे. पण या एक्सचेंज ऑफरचा फायदा घेण्यासाठी तुमच्या जुन्या फोनचं मॉडेल आणि कंडीशन चांगली असणं गरजेचं आहे.

आयफोन १३ चे स्पेसिफिकेशन्स

Apple iPhone 13 स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 12MP चा आहे. तसेच आणखी एक 12MP कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोर आणखी 12MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये A15 बायोनिक चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. चिप प्रोसेसर

वाचा : Hyundai EXTER जुलैमध्ये ‘या’ दिवशी होणार लाँच, दमदार डॅशकॅमसह इलेक्ट्रिक सनरूफ पाहा खास फीचर्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.