Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अनैतिक संबंधातून घडलेल्या अर्थिक व्यावहारातुन झालेल्या वादातुन मित्रांनीच केला मित्राचा खुन नारायणगाव पोलीस स्टेशनची कारवाई

93
तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख 

अनैतिक संबंधातून घडलेल्या अर्थिक व्यावहारातुन झालेल्या वादातुन मित्रांनीच केला मित्राचा खुन आरोपींना २४ तासात अटक. नारायणगाव पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

दिनांक २५/०५/२०२३ रोजी मौने नारायणगाव ता. जुन्नर जि. पुणे गावचे हददीतील खोडदरोड येथील तेल ओढयच्या वरील बाजूस पडिक जमिनीमध्ये एका अनोळखी इसमाचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी मारहाण करून खून केल्या प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाणेस गु.र.नं. २०८/२०२३ भा.द.वि.सं. कलम ३०२ प्रमाणे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मयताची ओळख पटवून सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याच्या सुचना मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सो यांनी नारायणगाव पोलीस स्टेशन तसेच स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अविनाश शिळीमकर सो यांनी तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. पृथ्वीराज ताटे सो यांनी विविध पथके तयार करून सदर गुन्हयाचा तपास सुरू केला.

सदर मयताचा फोटो नारायणगाव परिसरामध्ये सोशल मिडीयादवारे प्रसारित करून सदर मयत इसमाची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू केला. रात्री उशीरा सदर मयताचा फोटो पाहून मयताचे नातेवाईक यांनी मयताची ओळख पटविली असून सदर मयताचे नाव साहेबराव नामदेव भुतांबरे वय ४५ वर्षे रा. कोतूळ ता. अकोले जि. अहमदनगर सध्या रा. पाटेखैरेमळा नारायणगाव ता.जुन्नर जि. पुणे असे असल्याचे निष्पन्न झाले सदर आरोपी हा मुळचा कोतूळ ता. अकोले जि. अहमदनगर येथील असून कामानिमीत्त गेल्या काहि दिवसांपासून नारायणगाव येथे वास्तव्यास होता.

सदर इसमाची ओळख पटल्यानंतर त्याची नारायणगाव परिसरामध्ये गोपनीय बातमीदारामार्फत त्याच्या बददल माहिती घेतली असता. तो जेसीबी ड्रायव्हर असल्याचे समजले तसेच घटनेच्या रात्री त्याला २ इसमांसोबत खोडदरोड च्या दिशेने जाताना पाहिले होते त्यामुळे सदरच्या गुन्हयात त्याच्या सोबतच्या त्या २ इसमांचा सहभाग असल्याचा संशय आल्याने लागलीच त्यांचा शोध नारायणगाव परिसरामध्ये सुरू केला. तद्नंतर दिनांक २६/०२/२०२३ रोजी गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मयत साहेबराव नामदेव भुतांबरे वय ४५ वर्षे याचे सोबत असणारे ते २ इसमांना नारायणवाडी परिसरातून ताब्यात घेवून त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) प्रियाल उर्फ बंटी गंगाराम खरमाळे वय ३१ वर्षे रा. अमरवाडी खोडद ता. जुन्नर जि. पुणे, २) देवराम विठठल कोकाटे वय २७ वर्षे रा. कुंभारआळी खोडद ता. जुन्नर जि. पुणे अशी असल्याचे सांगितले सदर गुन्हयाबाबत त्यांचेकडे चौकशी सुरू केली. चौकशी सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्यांचेकडे अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा अनैतिक संबंधातून घडलेल्या आर्थिक व्यवहाराच्या वादातून केल्याचे निषन्न झाले असुन सदर गुन्हयाचा पुढील अधिकचा तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद धुर्वे हे करत आहेत.

सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल साो. जिल्हा पुणे ग्रामीण, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. मितेश घट्टे सो, पुणे विभाग, श्री. रविंद्र चौधर उपविभागिय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पृथ्वीराज ताटे, पोसई धुर्वे, पोसई धनवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई अभिजित सावंत, पो. हवा. दिपक साबळे, विक्रम तापकिर, राजु मोमीण, पोना संदिप वारे, पो. कॉ. अक्षय नवले, निलेश सुपेकर तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे पो.हवा. कोकणे, पो.ना. मंगेश लोखंडे, शैलेश वाघमारे, गोरक्ष हासे, संतोष साळुंके, योगेश गारगोटे, गोकुळ कोळी, गोविंद केंद्रे, अरविंद वैदय यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.