तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

पुणे गुन्हे शाखा युनिट-१ ची आंबेगाव परिसरात कारवाई; गावठी पिस्तुलासह १८ वर्षीय तरुणाला अटक!

0 3

पूणे : परवेज शेख 

पुण्यातील आंबेगाव परिसरात गावठी पिस्तुलासह १८ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखा युनिट-१ ने ताब्यात घेतले आहे.

दिनांक २२ ऑक्टोबर २०२६ रोजी ही कारवाई करण्यात आली.

दत्तनगर, आंबेगाव परिसरातील स्वाद हॉटेलजवळ, श्री स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटरच्या बाजूला एक तरुण गावठी पिस्तुलासह थांबला असल्याची गोपनीय माहिती पोलीस अंमलदार अविनाश दळवी यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या सूचनेनुसार पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तेथे प्रणव विजय सणस, वय १८ वर्षे, याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे लोखंडी पिस्तुल आढळून आले.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला आंबेगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त गौहर हसन आणि सहायक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, सहायक पोलीस निरीक्षक धीरज राऊत, तसेच पोलीस हवालदार संतोष नागरे, समीर शेख, अतुल साळवे, सचिन अहिवळे, सचिन कोळी आणि अविनाश दळवी यांनी सहभाग घेतला.

 

पुण्यातील गुन्हेगारी घडामोडींच्या ताज्या अपडेटसाठी पाहत राहा

Leave A Reply

Your email address will not be published.