तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

खराडी पोलिसांची धडक कारवाई! वाहनचोरीचे ५ गुन्हे उघड; ४४ वर्षीय आरोपीला अटक

0 7

पोलीस महानगर :  पुणे – परवेज शेख 

 

पुणे शहरातील खराडी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत वाहनचोरीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी एका ४४ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.

खराडी परिसरातून होंडा कंपनीची डिओ दुचाकी चोरीला गेल्याप्रकरणी खराडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस अंमलदार मनोज खरपुडे आणि अशोक केदार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी लोहगाव परिसरातून संशयित आरोपी जगजितसिंग कुलदीपसिंग काठोडे, वय ४४ वर्षे, याला ताब्यात घेतले.

तपासादरम्यान आरोपीने पुणे शहरातील विविध भागांतून पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कारवाईत खराडी, कोथरूड, डेक्कन आणि विमानतळ पोलीस स्टेशनमधील वाहनचोरीचे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर आणि सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक तेजस मगर करीत आहेत.

 

पुण्यातील क्राईम न्यूजच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा पोलीस महानगर

Leave A Reply

Your email address will not be published.