Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Career after SSC: दहावीचा निकाल लागण्याआधी ‘हे’ काम करा, उज्ज्वल भविष्यासाठी होईल मदत

9

Career After SSC: महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून दहावीचा निकाल(Maharashtra Board SSC Result) जून महिन्यात जाहीर केला जाणार आहे. निकालासाठी काही दिवस शिल्लक आहेत. राज्यभरातून दहावीची परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी निकालाच्या (SSC Result 2022) प्रतिक्षेत आहेत.दहावीची बोर्ड परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थी जीवनाचा नवा टप्पा सुरू होतो. येथूनच करिअरचा (Career After SSC) पाया सुरू होतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे दहावीचा निकाल लागल्यानंतर कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. त्याबद्दल जाणून घेऊया.

इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेला बसलेले बहुतांश विद्यार्थी सध्या रिलॅक्स आहेत. तर काहींनी आतापासून बोर्डाच्या निकालाचे टेन्शनही घ्यायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, असेही काही विद्यार्थी आहेत ज्यांनी अकरावीमध्ये कोणती स्ट्रीम निवडावी यासाठी करिअर काऊन्सिलरचा सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे. जर तुम्हीही यावर्वी बोर्डाची परीक्षा दिली असेल, तर मोकळ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तसेच योग्य स्ट्रिम कशी निवडायची? यासाठी काही टिप्स जाणून घ्या.

दहावीनंतर योग्य स्ट्रीम कशी निवडावी?
दहावी बोर्डाच्या परीक्षेनंतर योग्य स्ट्रीम निवडणे हा महत्वाचा निर्णय मानला जातो. ते निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घ्या. यासाठी विद्यार्थी त्यांच्या पालकांची, शिक्षकांची किंवा वरिष्ठांचीही मदत घेऊ शकतात.

१) तुम्हाला कोणत्या विषयाची आवड आहे? हे समजून घ्या. त्या आर्ट, कॉमर्स, सायन्स अशा स्ट्रीमपैकी तुम्ही कोणत्या स्ट्रीममध्ये सहज शिक्षण घेऊ शकता याचा अंदाज घ्या. यासाठी जवळच्या पदवीधर विद्यार्थ्यांची मदत घ्या. त्यांच्याशी चर्चा करा.

२) तुमच्या आवडत्या स्ट्रीमसाठी कोणते कॉलेज बेस्ट आहे, याची माहिती घ्या.

३) बोर्डाची परीक्षा आणि नवीन सत्र सुरू होण्याच्या दरम्यानच्या वेळेचा पुरेपूर वापर करा. या दरम्यान, तुमच्या बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करा. त्यामुळे अकरावी सुरु झाल्यावर तुम्हाला कोणता त्रास होणार नाही.

Writing Tips: टायपिंगच्या युगात लिहिण्याचा सराव सुटलाय? या टीप्सने करा कमबॅक
४) उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेमिंगसारख्या गोष्टींमध्ये व्यस्त होऊन तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवू नका. अकरावीच्या अभ्यासक्रमाची तयारी सुरू केली तर बरे होईल.

५) दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळणार नाहीत असे वाटत असेल तर तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी देखील करु शकता.


बोर्डाची परीक्षा संपल्यानंतर काय करायचे?

दहावी बोर्डाची परीक्षा संपून अकरावी सत्र सुरू होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आतापर्यंतचा सर्व वेळ मजामस्ती करण्यात घालविला असेल तर काही महत्वाच्या गोष्टी देखील समजून घ्या. आणि पुढील काही दिवसात त्या अंमलात आणण्याचा प्रयत्न करा. या वेळेत विविध क्षेत्रांशी संबंधित कार्यक्रम, चर्चासत्र यामध्ये सहभागी होऊ शकता. यातील बहुतांश कार्यक्रम हे ऑनलाइन माध्यमातून मोफत आयोजित केलेले असतात. या विविध कार्यक्रमांतील मान्यवरांचे अनुभव ऐकून तुमचे क्षेत्र निवडण्यास मदत होऊ शकते. संपूर्ण दिवस फक्त खेळण्यात, मित्रांसोबत खेळण्यात किंवा चित्रपट पाहण्यात घालवू नका. या काळात स्वतःला तंदुरुस्त ठेवा.

दहावीनंतर आर्ट्स, सायन्स की कॉमर्स? कन्फ्यूज असाल तर ‘येथे’ मिळेल तुमचे उत्तर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.