Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग आणि दिनविशेष ५ जून २०२३ : शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

8

राष्ट्रीय मिती ज्येष्ठ १५, शक संवत १९४५, ज्येष्ठ, कृष्ण, प्रतिपदा, सोमवार, विक्रम संवत २०८०, सौर ज्येष्ठ मास प्रविष्टे २२, जिल्काद २५, हिजरी १४४५ (मुस्लिम), त्यानुसार इंग्रजी तारीख ५ जून सन २०२३. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋतु.राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. प्रतिपदा तिथी सकाळी ६ वाजून ४० मिनिटापर्यंत त्यानंतर द्वितीया तिथी प्रारंभ. मूल नक्षत्र अर्धरात्रौ १ वाजून २३ मिनिटापर्यंत त्यानंतर पूर्वाषाढ नक्षत्र प्रारंभ. साध्य योग सकाळी ८ वाजून ४८ मिनिटापर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ. कौलव करण सकाळी ६ वाजून ४० मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र धनु राशीत संचार करेल.

सूर्योदय: सकाळी ६-०२ पर्यंत,
सूर्यास्त: सायं. ७-१३,
चंद्रोदय: रात्री ८-४७,
चंद्रास्त: सकाळी ६-४७,
पूर्ण भरती: दुपारी १-०१ पाण्याची उंची ४.६९ मीटर, रात्री १२-४४ पाण्याची उंची ३.९७ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-०० पाण्याची उंची ०.२१ मीटर, साय. ७-०२ पाण्याची उंची १.७७ मीटर.

दिनविशेष: गुरू हरगोविंदसिंह जयंती, जागतिक पर्यावरण दिन.

(दामोदर सोमन)

आजचा शुभ मुहूर्त :
अभिजीत मुहूर्त सकाळी ११ वाजून ५२ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटापर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३९ मिनिटे ते ३ वाजून ३४ मिनिटापर्यंत राहील. निशीथ काळ रात्री ११ वाजून ५९ मिनिटे ते १२ वाजून ४० मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ७ वाजून १५ मिनिटे ते ७ वाजून ३५ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सायं ७ वाजून ३१ मिनिटे ते ८ वाजून ५९ मिनिटापर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ दुपारी १२ वाजून ४७ मिनिटे ते १ वाजून ४३ मिनिटापर्यंत राहील. यानंतर दुपारी ३ वाजून ३४ मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत राहील.

आजचे उपाय : महादेवाच्या मंदिरात शिव चालीसाचा पाठ करा आणि शिवलिंगास दूधाचा अभिषेक करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.