Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पैसे न देता ऑनलाइन बुक करा ओयो, जाणून घ्या डिटेल्स

9

ओयोकडून एक नवीन पेमेंट सर्विस आणली गेली आहे. कंपनीकडून नवीन सर्विस स्टे नॉउ एंड पे लेटर ला सुरू करण्यात आले आहे. ही सर्विस सध्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या नवीन सर्विस मध्ये यूजर्स आधीच रूम बुक करू शकतात. तर पेमेंट नंतर करण्याचा ऑप्शन यात दिला आहे. यात यूजर्सला लगेच पैसे भरावे लागणार नाहीत. खरं म्हणजे ओयोने Simpl सोबत प्लान केला आहे. हा एक क्रेडिट बेस्ड पेमेंट सर्विस आहे.

१५ दिवसात करू शकाल पेमेंट
स्टे नॉउ पे लेटर फीचर्स मध्ये कंज्यूमरला एक क्रेडिट लिमिट ऑफर दिली जाणार आहे. या सर्विसमध्ये यूजर्सला ५ हजार रुपयाचे क्रेडिट ऑफर केले जाणार आहे. याचाच अर्थ ५ हजार रुपयांपर्यंत रूफ बुक करू शकाल. यासाठी तुम्हाला कोणतेही चार्ज द्यावे लागणार नाही. या पेमेंटला यूजर्स १५ दिवसानंतर पे करू शकतील. या फीचरला ओयो अॅपच्या होम स्क्रीनवर उपलब्ध करण्यात आले आहे. हे फीचर सध्या अँड्रॉयड यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले आहे. याला लवकरच iOS यूजर्ससाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

वाचाः ४० रुपये कमी किंमतीतील जिओचा हा रिचार्ज ठरला हिट, १२ जीबी एक्स्ट्रा डेटा आणि फ्री कॉलिंग

स्वस्तात बुक करू शकाल ओयो रूम
ओयोकडून एक प्रवासाची ऑफर सुरू करण्यात आली आहे. ज्यात बुक नाउ पे लेटरचा ऑप्शन दिला जात आहे. खरं म्हणजे उन्हाळ्यात सुट्टीत जास्त संख्येत लोक फिरण्यासाठी बाहेर जात असतील तर त्यांच्यासाठी ही चांगली ऑफर आहे. ओयोकडून समर ऑफर मध्ये बुक नॉउ पे लेटर चा ऑप्शन मिळणार आहे. भारतासह जगभरात ओयो सर्विस उपलब्ध आहे. या ठिकाणी कमी किंमतीत रूम बुक केले जाऊ शकतात.

वाचाः Xiaomi Pad 6 भारतात लाँच, ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतील दमदार फीचर्स

वाचाः Apple Days sale मध्ये स्वस्तात आयफोन खरेदीची संधी, शानदार सूट पाहा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.