Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सॅमसंगचा हा टीव्ही खरेदी करा अन् Samsung Galaxy S23 Ultra एकदम फ्री मिळवा

10

कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड सॅमसंगने बिग टीव्ही डेज सेलची घोषणा केली आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम टीव्हीला खूपच स्वस्तात खरेदी करण्याची संधी आहे. हा सेल २५ जुलै पर्यंत सुरू राहणार आहे. या दरम्यान तुम्ही नियो क्यूएलईडी ८ के, नियो क्यूएलईडी, क्यूएलईडी, ओएलईडी, द फ्रेम आणि क्रिस्टल ४के यूएचडी सारख्या टीव्हीला खूपच स्वस्त किंमतीत खरेदी करू शकता.

यासोबत ईएमआय अंतर्गत २० हजार रुपयाचा कॅशबॅक मिळवू शकता. याशिवाय, काही निवडक बिग स्क्रीन टीव्ही खरेदीवर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजचा सॅमसंग गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा फ्री मिळेल. याची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. तर ६९ हजार ९९० रुपयाच्या किंमतीत फ्री स्टाइल प्रोजेक्टर आणि ५१ हजार ९९० रुपयांपर्यंत साउंडबार सारखे बेनिफिट फ्री मिळतील. हा सेल प्रमुख रिटेल स्टोर्स आणि Samsung.com वर उपलब्ध आहे.

जर तुम्ही ९८ इंचाचा टीव्ही ४ खरेदी करीत असाल तर तुम्हाला फ्लॅगशीप गॅलेक्सी एस २३ अल्ट्रा फ्री दिला जाईल. जर तुम्ही ८५ इंचाचा आणि ७५ इंचाचा नियो QLED 8K टीव्ही, ७७ इंचाचा ओलेड टीव्ही, ८५ इंचाचा नियो QLED टीव्ही खरेदी करीत असाल तर तुम्हाला ६९ हजार ९९० रुपयाचे फ्री स्टाइल प्रोजेक्टर फ्री दिले जाणार आहे.

वाचाः ५०० रुपयात खरेदी करा Air Cooler, टेबलवर होतो फिट, कूलिंगला तोड नाही

कंपनीच्या म्हणण्यानुसार, ७५ इंचाचा नियो QLED 8K आणि 4K टीव्ही तसेच ७७ इंचाचा ओलेड टीव्ही खरेदी करणाऱ्यांना ५१ हजार ९९० रुपयाचा HW-S800B साउंडबार फ्री दिला जाणार आहे. ८५ इंचाचा क्रिस्टल ४के यूएचडी टीव्ही, ६५ इंचाचा नियो क्यूएलईडी आणि ८ के टीव्ही, ६५ इंचाचा ओलेड टीव्ही, ७५ इंचाचा द फ्रेमच्या खरेदीवर यूजर्सला २८ हजार ९९० रुपयाचा एचडब्ल्यू-क्यू600बी साउंडबार फ्री मिळेल. याशिवाय, ५५ इंचाचा नियो QLED टीव्ही आणि ५५ इंच क्यूएलईडी टीव्ही खरेदी वर यूजर्सला १५ हजार ४९० रुपयाचा HW-B450 साउंडबार फ्री मिळेल.

वाचाः फोन नंबर बदललाय?, तत्काळ आधार कार्डला करा अपडेट, फक्त ५० रुपये खर्च

सर्व स्पेसिफिकेशन्स पाहा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.