Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

​Smartphone Care : ‘हे’ ५ गॅजेट्स वापरा, स्कॅमर्स, हॅकर्स सर्वांपासून फोन राहिल एकदम सेफ

8

​कॅमेरा कव्हर वापरल्याने बसेल स्कॅमर्सना आळा

अनेक स्कॅमर्स सामान्यतः वापरकर्त्यांचे फोन हॅक करताना त्यांच्या कॅमेर्‍याद्वारे फोनमध्ये प्रवेश मिळवतात. फोनचा कॅमेरा फक्त फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी नाही तर हॅकर्सना हॅक करण्याचा एक मार्ग आहे. दरम्यान त्यामुळेच पुढील आणि मागील दोन्ही कॅमेर्‍यांसाठी कॅमेरा कव्हर वापरणे हे असं होण्यापासून रोखू शकते कारण हॅकर्स फोन हॅक केल्यानंतरही काहीही पाहू आणि रेकॉर्ड करू शकणार नाहीत.

​वाचा : AC मुळे लाईट बिल खूप येतंय? ‘या’ ५ टिप्स फॉलो केल्यास वाचेल वीज आणि कमी येईल वीजबिल

फ्लिप कव्हर ही आहे कामाची गोष्ट

फ्लिप कव्हर ही आहे कामाची गोष्ट

तर फोनचं फ्लिप कव्हर्स सहसा फोनचा डिस्प्ले झाकून ठेवतात आणि फोन अनलॉक केलेला असला तरीही तुमच्या फोनचे नोटिफिकेशन किंवा इतर कोणताही डेटा दुसऱ्याला पाहण्यापासून रोखतात. त्यामुळे फ्लिप कव्हर्स एक अत्यंत महत्त्वाचं गॅजेट आहे, जे सहज उपलब्ध होत असून भरपूर कामाला येईल.

वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

तुम्ही ​फिजिकल सिक्युरिटी की देखील वापरु शकता.

तुम्ही ​फिजिकल सिक्युरिटी की देखील वापरु शकता.

फिजिकल सिक्युरिटी की हे एक USB सारखे हार्डवेअर आहे जे अकाउंट्स, डिव्हाइस आणि इतर टूल्ससाठी एन्क्रिप्टेड पासवर्ड आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स ठेवते. एकदा सेट केल्यावर, वापरकर्त्यांना फोन, अॅप किंवा खाते अनलॉक करण्यासाठी सुरक्षा की वापरावी लागेल. तर हे देखील एक भारी गॅजेट आहे, ज्याने फोन सुरक्षित राहू शकतो.

वाचा : BSNL चा एक वर्षाचा रिचार्ज अगदी स्वस्तात, महिन्याला खर्च करा फक्त १२६ रुपये, दररोज मिळेल 2GB डेटा​

​सार्वजनिक ठिकाणी फोन चार्ज करताना वापरा USB डेटा ब्लॉकर

-usb-

सार्वजनिक ठिकाणी चार्जिंग करताना फोनचा डेटा चोरीला जाणे ही आजकाल एक सामान्य घटना बनली आहे. दरम्यान यूएसबी डेटा ब्लॉकर्स, ज्यांना यूएसबी कंडोम देखील म्हणतात, हे छोटे अडॅप्टर आहेत जे यूएसबी केबलमधील डेटा ट्रान्सफर पिन ब्लॉक करतात, ज्यामुळे फक्त पॉवर पिन कनेक्शन होते जो फक्त फोन चार्ज करते, हे वापरकर्त्यांना कोणत्याही काळजीशिवाय सार्वजनिक चार्ज वापरून त्यांचे फोन चार्ज करण्यास अनुमती देते.

वाचा : Upcoming Smartphones : नवा फोन घ्यायचा विचार करताय? थांबा, भारतात लाँच होत आहेत दमदार स्मार्टफोन्स

​स्पेशल स्क्रिन गार्ड

​स्पेशल स्क्रिन गार्ड

तर आपण सर्वचजण फोनला स्क्रिन गार्ड वापरतो, पण असेही खास स्क्रिन गार्ड आहेत, जे प्रायव्हसी हार्डवेअर म्हणून वापरता येतात. हे आपल्या नॉर्मल स्क्रीन गार्डसारखे आहे जे प्रायव्हसी फिल्टर म्हणून देखील काम करतात. ज्यामुळे इतरांना तुमच्या फोनची स्क्रीन एका साईडून पाहता येत नाही. तुम्ही तुमचे डिव्हाइस सार्वजनिकपणे वापरत असल्यास किंवा तुम्हाला तुमची माहिती खाजगी ठेवायची असल्यास हे उपयुक्त ठरू शकते.

वाचा : Google Maps : ड्रायव्हिंग करताना गुगल मॅप वापरता? ‘हे’ पाच फीचर्स वापरा, पैसे आणि वेळ दोन्ही वाचेल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.